मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोणतंही नातं दोन्ही बाजूंनी असतं. समाजासाठी घर-संसाराला बाजूला सारून नियमितपणे कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस, आरोग्य व स्वच्छता कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशभर 22 मार्चला नागरिकांनी टाळी आणि थाळी वाजवली होती. लष्कराने हॉस्पिटल्सवर पुष्पवृष्टीही केली होती. ही कृतज्ञता नागरिकांनी व्यक्त केल्यावर पोलिसांनीही मुंबईतील नागरिकांनी दिलेल्या साथीबद्दल त्यांना धन्यवाद दिले आहेत. मुंबई पोलीस आयुक्तांच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
‘आभार मुंबई, आम्हावरील तुमच्या विश्वासासाठी, प्रणाम मुंबई, तुमच्या पाठिंब्यासाठी वचन मुंबई – मुंबई पोलीस आहेत नेहमी या शहराच्या संरक्षणासाठी… ‘ असं ट्विट CP Mumbai Police या ट्विटर हँडलवरून करण्यात आलं आहे. त्याबरोबर मुंबई पोलिसांवर विश्वास दर्शवणाऱ्या मुंबईकरांच्या प्रतिक्रियांचा व्हिडिओही ट्विट केला आहे. Mumbaikars on Mumbai Police हा 2 मिनिटं 8 सेकंदांचा व्हिडिओला आतापर्यंत 11.2 व्ह्यूज मिळाले आहेत. समाजाच्या विविध घटकांतील लोकांनी मुंबई पोलिसांच्या कामाबद्दल आदर आणि अभिमान व्यक्त केला आहे