नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकतीच रिलायन्स जिओने संतप्त ग्राहकांना नाराजी घालवण्यासाठी 99 रुपयांची ऑफर दिली आहे. वास्तविक या ऑफरची खरी किंमत 399 रुपये आहे परंतु जिओच्या कॅशबॅक ऑफरखाली ती 99 रुपयांमध्ये मिळत आहे. जिओने यासाठी अमेझॉन पे बरोबर भागीदारी केली आहे, ज्याद्वारे 399 रुपयांच्या रिचार्जवर 300 रुपयांपर्यंतचे कॅशबॅक दिले जात आहे, ज्यामध्ये ही ऑफर 99 रुपयांना उपलब्ध असेल.
56 दिवसांसाठी सर्व काही विनामूल्य
रिलायन्स जिओच्या या ऑफरमध्ये 56 दिवसांची वैधता देण्यात येत आहे, ज्यामध्ये सर्व सेवा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध होतील. या ऑफरमध्ये जिओ नेटवर्कवर अमर्यादित फ्री व्हॉईस कॉलिंग उपलब्ध असेल. अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 2000 IUC मिनिटे दिली जातात. 56 दिवसांसाठी दररोज 1.5 जीबी विनामूल्य डेटा दिला जात आहे.
15 फेब्रुवारी पर्यंत लाभ घ्या
या ऑफरसह उपलब्ध कॅशबॅक ऑफर 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान वैध आहे. या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर 15 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. ज्यामध्ये तुम्हाला 300 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल.