बहुजननामा ऑनलाइन टीम : हैदराबादमध्ये 26 वर्षांच्या पशुवैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार आणि तिच्या निर्घृण हत्याने सगळीकडे भितीचे वातावरण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणात एका व्यक्तीचे नाव पुढे येत आहे, ज्याने चार आरोपींना पकडण्यात पोलिसांना मदत केली. सायबराबाद पोलिसांनी शुक्रवारी चार आरोपी मोहम्मद आरिफ (वय 26), जोलू शिव (वय 20), जोलू नवीन (वय 20) आणि चिंताकुटा चिन्नाकेशवाउलू (वय 20) यांना अटक केली. हे सर्व जण नारायणपेट जिल्ह्यातील राहणारे आहेत.
या प्रकरणातील लिंगाराम प्रवीण गौडा हा एक महत्त्वाचा साक्षीदार मानला जातो. सदर प्रकरणाविषयी वृत्तवाहिन्यांनी प्रसारण सुरू करताच शमशाबाद पोलिसांना गौडाने हेल्पलाईन नंबर 100 वर कॉल केला होता. गौडा या भागात असलेल्या पेट्रोल पंपावर काम करतो. प्रवीणने पोलिसांना सांगितले होते की, आदल्या रात्री लाल स्कूटरवर आलेल्या शाळेतील दोन मुलांनी प्लास्टिकच्या बाटलीत पेट्रोल खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांच्यावर शंका आल्याने त्यांना पेट्रोल देण्यासाठी नाकारले. प्रवीणने पोलिसांकडे दावाही केला होता की, त्याची छायाचित्रे जर त्यांना दाखविली गेली तर तो त्यांना ओळखू शकेल.
प्रवीण दिलेल्या माहितीमुळे, आरोपींना पकडण्यात पोलिसांना मदत झाली. पोलिसांच्या रिमांड रिपोर्टमध्ये ही गोष्ट स्पष्ट झाली की खुनाच्या रात्री या प्रकरणातील आरोपी क्रमांक दोन असलेला जोलू शिव हा पीडितेचा दुचाकी दुरुस्त करण्याच्या उद्देशाने आला होता. दरम्यान, पीडित मुलीला जबरदस्तीने प्लॉटवर नेऊन सामूहिक बलात्कार केला. शिवा स्कूटीला दुरुस्त करण्यासाठी आला होता आणि त्याने डॉक्टरवरही बलात्कार केला. पीडित वारंवार ओरडत होती आणि तिला थांबविण्यासाठी दारू पिण्यास भाग पाडले जात होते. यानंतर तिची हत्या करण्यात आली.
शादनगरच्या न्यायाधिशाने शनिवारी चारही आरोपींना १४ दिवसांच्या कोठडीत पाठवले. चारही आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून त्यांना शादनगर पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरीचा चालक असलेला मोहम्मद आरिफ हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. मंगळवारी तो हैदराबादमध्ये सामान डिलेवरी करणार होता. ज्याला सामान डिलेवरी करणार होता तो भेटला नाही. आरिफ यांनी आपले क्लिनर जोलू शिवा यांच्यासह उर्वरित दोन दोषींना बोलावून तोंडुपाली टोल गेटजवळ लॉरी पार्क केली. हे ठिकाण हैदराबाद बाहेर आहे. या योजनेचा एक भाग म्हणून नवीनने पीडित मुलीच्या स्कूटरचा टायर पंचर केला आणि नंतर ती परत येण्याची वाट पाहत पाहिली. रात्री ९.१५ च्या सुमारास पीडित मुलगी आपली स्कूटी घेण्यासाठी परत आली असता आरिफ त्याच्या लॉरीमधून बाहेर आला. त्याने सांगितले की, तिच्या स्कूटरचा टायर पंचर आहे. यानंतर त्याने तिला दुरुस्तीची ऑफर दिली. त्यानंतर आरिफने स्कूटी दुरुस्त करण्यासाठी क्लिनर शिवला पाठविले. त्याचवेळी पीडित मुलीने आपल्या बहिणीला फोन करुन सांगितले की ती खूप घाबरली आहे.
Visit : bahujannama.com