भोकर : बहुजननामा ऑनलाईन – अवैध धंदे शहरात जोरात सुरू असताना भोकर शहरात भारत प्रभात पार्टी कडून दि.२५ जानेवारी २०२० रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भोकर येथे आमरण उपोषण मांडले होते ते अवघ्या ३ तासात पोलीस यंत्रणा अवैध धंदे बंद न करता बसण्याची परवानगी उपोषण कर्त्यास मागून त्यास उपोषण समोर ढकलत आहे असे लिहून घेऊन त्या दिवशी उपोषण सोडण्यास सांगितले त्यानंतर पोलिसांनी कार्यवाहीचे धाड सत्र सुरू केले आहे अशी चर्चा शहरात जोर धरू लागली आहे.
त्याच पार्टीकडून दिनांक ०७ फेब्रुवारी २०२० रोजी आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन पोलिसांच्या हाती मिळताच पोलिसांनी उपोषण कृत्याच्या नातेवाईक यांच्यावर गुन्हा खोटा दाखल केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सविस्तर वृत्त असे की,
दि.२९जानेवारी २०२० रोजी आपल्या कार्यालयात कृष्णा तलवारे यांच्या सांगण्यावरून एक कागदावर सही केली व त्या नुसार एका प्रतिष्ठित व्यक्तीवर काल गुन्हा दाखल झाला आहे तो सर्रास खोटा आहे मी दारूच्या नशेत असल्याने मला काही एक माहीत नाही.मी दिलेल्या तक्रारी खोटी आहे.दाखल झालेला गुन्हा सर्रास खोटा आहे.
मला व्यंकटेश नर्तावार यांनी कुठलीही शिवीगाळ केली नाही मी सदरील तक्रार कृष्णा तलवारे यांच्या सांगण्यावरून केली आहे जर व्यंकटेश नर्तावार यांच्यावरील गुन्हा मागे नाही घेतल्यास फिर्यादी देविदास रंगराव भंडरवार याने आत्मदहन करेल असे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यलय, भोकर यांना दि.३० जानेवारी २०२० रोजी कळविले आहे,सोबत गुन्हा लवकरात लवकर मागे घ्यावा अशी विनंती अर्ज दाखल केला यावर वरिष्ठ काय कार्यवाही करतील ह्या कडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.