पालघर : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना विषाणूच्या विळख्यापासून कोणच सुटू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालीय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेक लोकांना कोरोना झाला आहे. तर एक चिंताजनक बाब म्हणजे. आता पालघर येथील एका नवजात अर्भकाला newborn baby कोरोनाची बाधा झाली आहे. तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका हा लहान मुलांना बसण्याची भीतीही वर्तवली जाते. अर्भकाला कोरोना झाल्याने सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे.
अधिक माहितीनुसार, पालघरमधील सफाळे येथील टेकरीचा पाडा मधील रहिवाशी असलेल्या एका नवजात अर्भकाला newborn baby कोरोना झाला आहे. बाळाच्या जन्मानंतर १५ तासाने त्याची अँटिजन रॅपिट चाचणी केली गेली. त्यावेळी त्याच्या आईची देखील टेस्ट केली. यावेळी बाळाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर, बाळाच्या आईची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.
या दरम्यान, कोरोनाची बाधा झालेल्या त्या अर्भकाची प्रकृती स्थिर असून त्याला पुढील उपचारासाठी जव्हार येथील रुग्णालयात दाखल केले गेले. बाळाच्या आईवर पालघर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, बाळाची प्रकृती स्थिर असली तरी काही गुंतागुंत असल्याने त्यावर जव्हार रुग्णालयात उपचार देणे सोयीचे जाईल असे तेथील आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
‘हा’ काढा ठरतोय रामबाण उपाय ! रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, वजनही घटवा; जाणून घ्या
12 वी परीक्षांचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता, केंद्रीय शिक्षणमंत्री AIIMS मध्ये दाखल
कोरोनावर चमत्कारी औषधाचा दावा करणाऱ्या माजी मुख्याध्यापकाचा कोरोनानेच मृत्यू