बहुजननामा ऑनलाईन टीम : राजधानी दिल्लीच्या पहाडगंज भागात एका परदेशी महिलेचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ४९ वर्षीय ही महिला न्यूझीलंडमधील असून पहाडगंजमधील ताशकंद हॉटेलमध्ये तिचा मृतदेह आढळला आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ती हिंदू रूढीनुसार पतीबरोबर लग्न करण्यासाठी आली होती. सुरुवातीच्या तपासणीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे आढळले आहे.
याआधी मंगळवारी दिल्लीच्या अलीपूर भागात ओयो हॉटेलच्या खोलीत एका महिलेच्या मृत्यूची घटना उघडकीस आली होती. मंगळवारी सकाळी १०.३० पीसीआर फोनद्वारे ओयो हॉटेलच्या एका खोलीत एका महिला बेशुद्ध झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिस आल्यावर ३३ वर्षीय महिला निशा (बदललेले नाव) बेशुद्ध अवस्थेत सापडली, तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
मृत महिला दिल्लीतील खेरा कालांची असल्याचे सांगितले जात आहे. ओयो हॉटेलच्या खोलीचे बुकिंग या महिलेच्या नावावर होते आणि तिचा आरोपी विक्की मान (वय २१) तिच्याबरोबर खोलीत राहिला होता. आरोपी हा अलीपूरचा रहिवासी आहे.आरोपीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दोघे एक दिवस अगोदर हॉटेलमध्ये आले होते. ते दोघे खोलीत मद्यपान करीत होते, त्यादरम्यान भांडण सुरू झाले. भांडणाच्या वेळी आरोपींनी पीडित मुलीच्या गळ्यावर हल्ला केला, त्यानंतर ती बेशुद्ध झाली आणि आरोपी तेथून पळून गेला. त्याचवेळी पोलिसांनी अलीपूरचे एसएचओ निरीक्षक सुनील कुमार यांनी आरोपीला अटक केली आहे.
Visit : bahujannama.com