वेलिंग्टन : वृत्तसंस्था – न्यूझीलँडच्या सेक्स वर्करने एका उद्योगपतीच्या विरोधात लैंगिक हिंसेची तक्रार दाखल केली होती. प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान येथील मानवाधिकार आयोगाने दंड म्हणून या सेक्स वर्करला 6 आकडी रक्कम देण्याचे आदेश दिले.
मानवाधिकार आयोगाचे संचालक मायकल टिम्मिंस यांनी म्हटले की, हा दंड एक आवश्यक इशारा आहे, जो आठवण करून देतो की कुणीही कामगार, जरी तो कोणत्याही क्षेत्रात काम करत असेल, कार्यस्थळी त्याचे लैंगिक शोषण केले जाऊ शकत नाही आणि कामगाराला याच्या विरोधात आवाज उठवण्याचा पूर्ण अधिकार आहे.
मायकल टिम्मिंस यांनी म्हटले, आम्ही सर्व बिझनेस मालक आणि त्यांच्या कर्मचार्यांना हे ठरवण्यासाठी प्रोत्साहित करतो की, त्यांनी सेक्स वर्कर्सचे अधिकार समजून घ्यावेत आणि त्यांचा सन्मान करावा. आयोगाने म्हटले की, या दंडाचा उद्देश महिलेला भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या झालेल्या नुकसानीची भरपाई करून देणे आहे. आयोगाकडून या महिलेची ओळख आणि प्रकरणाची सर्व माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे.
हे प्रकरण सेक्स वर्कर्सच्या मानवाधिकार कायद्यांतर्गत दाखल करण्यात आले होते. मानवाधिकार ट्रिब्यूनलने म्हटले, सर्वकाही यावर अवलंबून आहे की, कोणती गोष्ट कोणत्या संदर्भात केली जात आहे. एका वेश्यालयात सुद्धा अयोग्य आणि अवमानकारक भाषेचा वापर करता येणार नाही.
ट्रिब्यूनलने म्हटले, असे मानले जात आहे की, एका सेक्स वर्करला हे जाणून घेणे आवश्यक नाही की, तिला आपल्या ग्राहकाची भाषा अप्रिय किंवा अवमानकारक वाटते किंवा नाही.
न्यायालयाने म्हटले, जर एका वेश्यालयात चुकीची लैंगिक वागणूक किंवा भाषेला अप्रिय किंवा अवमानकारक मानले गेले नाही तर कायद्यांतर्गत सेक्स वर्कर्स आपल्या अधिकारापासून वंचित राहतील.