नवी दिल्ली : वृत्तसंस्था – न्यूयॉर्क टाइम्स (New York Times), सीएनएन (CNN), द गार्डीयन (The Guardian) यासह इतर काही आंतरराष्ट्रीय न्यूज वेबसाईट (News website) सध्या डाऊन झालेल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार, CDN म्हणजे Content Delivery Network मधील काही तांत्रिक कारणांमुळे ही अडचण निर्माण झाली आहे. या साईट्स ओपन करण्याचा प्रयत्न केल्यास 503 हा एरर दाखवत आहे. या वेबसाईट्स प्रामुख्याने अमेरिकेतील आहेत.
New York Times, CNN, among other international news websites are down, preliminary reports suggest a technical glitch in a private CDN (Content Delivery Network) causing outage, more details awaited.
— ANI (@ANI) June 8, 2021
कोणत्या वेबसाईट बंद पडल्या ?
1. न्यू यॉर्क टाइम्स
2. गार्डीयन
3. रेडिट
4. ब्रिटिश सरकारची जीओव्ही डॉट युके
5. इंडिपेंडंट
6. फायनान्शियल एक्सप्रेस
7. पे पल
8. ट्विटर
9. हुलूलू
10. सीएनएन
11. अमॅझॉन
12. फॅनडम
13. द वॉशिंग्टन पोस्ट
14. वॉल स्ट्रीट जर्नल
15. स्वेअरस्पेस
16. स्पॉटीफाय
17. ई बे
18. गीट हब
19. पीनस्ट्रेस्ट
यामधील काही साईट्स हळूहळू ओपन होऊ लागल्या आहेत. परंतु काही साईट्स अद्यापही बंदच आहेत. न्यूयॉर्क टाइम्सच्या वेबसाईटवर आम्ही ही तांत्रिक अडचण दूर करण्याच्या प्रयत्नात आहोत, काही वेळाने प्रयत्न करा, असा संदेश येतो आहे. तर इतर साईट्स फक्त तांत्रिक अडचण इतकाच संदेश देत आहेत.
कृपया हे देखील वाचा:
18 जणांचा आगीत होरपळून मृत्यू; कंपनी मालक निकुंज शहाविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
मर्सिडीजने सादर केली सर्वात शानदार कार, किंमत 2.60 कोटी रुपये
राज्यात 28 मेपर्यंत 5126 लोकांना म्युकरमायकोसिसची लागण
मालदिवला ‘या’ पध्दतीनं मदत करत भारताचा पाकिस्तानला मोठा दणका
जितेंद्र आव्हाडांचे सूचक ट्विट, म्हणाले – ‘…जो मरने के बाद भी सिस्टम को नंगा कर गई’