बहुजननामा ऑनलाइन टीम : देशात सर्वात मोठी आघाडीची मानली जाणारी बॅंक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI).नवीन वर्षात पहिल्याच महिन्यात स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांना एक आनंदाची बातमी देणार आहे. ती आनंदाची बातमी म्हणजे गृह कर्जाच्या व्याजात कमालीची कपात करण्यात येणार असल्याचे संकेत एसबीआयच्या व्यवस्थापकीय संचालक पी के गुप्ता यांनी दिले आहे. एका वृत्तस्थंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे संकेत देण्याच आले आहे.
एसबीआय गृह कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात करणार आहे. सध्या हा व्याजदर 8.15 टक्के आहे. या कर्जाचा थेट रेपो रेटसोबत संबंध जोडण्यात येणार असल्याने हे शक्य होणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट कमी केला तरीही बॅंका त्याचा फायदा ग्राहकांना देत नव्हत्या. आरबीआयने खडसवल्यानंतर बॅंका हा फायदा गेल्या काही महिन्यांपासून देत आहे. यामध्ये एसबीयाचा पहिला क्रमांक असतो.
येत्या 1 जानेवारीपासून गृह कर्जापासून सर्व उत्पादने ही रेपो रेटशी थेट जोडली जाणार आहे. अनेक वर्षानंतर ही प्रक्रिया लागू होणार आहे. यामुळे आमच्या ग्राहकांना 8 टक्क्यांपेक्षा कमी दराने कर्ज उपलब्ध होणार आहे. यामुळे 1 जानेवारीपासून ग्राहकांना 7.90 टक्के दराने व्याजदराचा लाभ मिळणार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीची सुरुवात 1 जानेवारीपासून होत आहे, असे गुप्ता यांनी सांगितले. महागाई उच्चांकावर आहे. हे आरबीआयनेही स्पष्ट केले आहे. यामुळे रेपो दरात कपात केली गेली नाही. महागाई कमी झाल्यावर दरात कमी करण्याची शक्यता आहे. जर मार्चमध्ये महागाई दर कमी झाला तर रेपो दरात कपात होईल, असेही गुप्ता यांनी सांगितले.
Visit : bahujannama.com