बीजिंग : वृत्तसंस्था – चीनमध्ये वेगाने पसरत असलेल्या एका रहस्यमय व्हायरसची लागण एका भारतीय शिक्षिकेला झाली आहे. शेनजेन शहरात या 45 वर्षीय शिक्षिकेच्या स्ट्रेप्टोकोकल संक्रमणावर उपचार सुरू आहेत. हा एक अज्ञात व्हायरस असून तो हळू-हळू पसरत आहे. शेनजेनसह वुहान प्रांतातही असेच प्रकार समोर आले आहेत. या रहस्यमय स्ट्रेप्टोकोकल व्हायरसची लागण झालेली ही शिक्षिका पहिली परदेशी महिला ठरली आहे. या महिलेची प्रकृती गंभीर असून तिला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे.
ही भारतीय महिला शेनजेनच्या एका अंतरराष्ट्रीय शाळेत शिक्षिका म्हणून काम करत असून तिचे नाव प्रीती माहेश्वरी आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. या शिक्षिकेचे पती अंशुमान खोवाल यांनी सांगितले की, ती सध्या व्हेंटीलेटरवर आहे. प्रथम अशी शंका होती की माहेश्वरी कोरोना व्हायरसच्या नव्या प्रकाराने ग्रस्त आहे. परंतु, नंतर त्यांच्या पतीने सांगितले की, तिला स्ट्रेप्टोकोकलची लागण झाल्याचे निदान झाले आहे.
चीनी शहर वुहानमध्ये रहस्यमय व्हायरल निमोनियाची साथ आहे. मीडियाच्या वृत्तानुसार, निमोनियाचे निदान करताना कोरोनाव्हायरस असल्याचे समोर आले आहे. वुहानमध्ये आतापर्यंत 17 नवीन केसेस समोर आल्या आहेत. तर एकुण 62 केसेस आहेत.
2002 मध्ये 650 लोकांनी गमावला होता जीव
कोरोनाव्हायरस हा विषाणुंचा एक मोठा समूह आहे, परंतु यातील सहा विषाणूच माणसाला संक्रमित करतात. याच्या सामान्य प्रभावात सर्दी-ताप होतो. परंतु, एसएआरएस (सिव्हीयर एक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम) असा कोरोनाव्हायरस आहे, ज्याच्यामुळे 2002-03 मध्ये चीन आणि हाँगकाँगमध्ये सुमारे 650 लोकांचा मृत्यू झाला होता.
भारताने जारी केली मार्गदर्शक सूचना
चीनच्या वुहानमध्ये निमोनियाच्या नव्या प्रकाराच्या प्रकोपामुळे दुसरा मृत्यू झाल्यानंतर शुक्रवारी भारताने चीनला जाणार्या सर्व नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. वुहानमध्ये सुमारे 500 भारतीय विद्यार्थी मेडिकलचा अभ्यास करता आहेत. जपान आणि थायलँडमध्ये सुद्धा प्रवास करण्यासंदर्भात असाच एक प्रकार समोर आला आहे.