नवी दिल्ली : वृत्तसंस्था- 1 फेब्रुवारी 2020 पासून अनेक बदल होणार आहेत. सर्वात महत्वाचे 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आर्थिक वर्ष 2020-21 चा अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या जातील, ज्यांचा परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. यासाठी तुम्हालाही याबाबत जाणून घेणे खुप आवश्यक आहे. अर्थसंकल्पासह अनेक बदल 1 फेब्रुवारीपासून होणार आहेत, याबाबत जाणून घेवूयात.
1 फेब्रुवारीपासून एलआयसी बंद करत आहे या 23 पॉलिसी
भारतीय जीवन वीमा निमग 31 जानेवारी 2020 नंतर 23 पॉलिसी बंद करत आहे. म्हणजे एक फेब्रुवारी 2020 पासून एलआयसीच्या या पॉलिसी मिळणार नाहीत. नोव्हेंबर 2019 च्या शेवटी भारतीय वीमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने जीवन वीमा कंपन्यांना, ते लाइफ इन्श्युरन्स आणि रायडर्स बंद करण्यास सांगितले आहेत जे नवीन प्रॉडक्ट गाईडलाईन्सनुसार नव्हते. यापूर्वी या कंपन्यांना हे प्रॉडक्ट परत घेण्यासाठी 30 नाव्हेंबर 2019 ही तारीख देण्यात आली होती, जी 31 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली होती. सोबत सध्याच्या जीवन वीमा पॉलिसीमध्ये बदल आणि दुसर्यांदा परवानगी घेण्यासाठी शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2020 आहे.
व्हॉट्सअपमध्ये बदल
1 फेब्रुवारीपासून जुनी अँड्रॉईड आणि आयओएस ऑपरेटिंग सिस्टम असणार्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअप सपोर्ट करणार नाही. व्हॉट्सअपने मागील वर्षीच याची घोषणा केली होती. तर अँड्रॉईडच्या 2.3.7 च्या व्हर्जनमध्येही व्हॉट्सअप चालणार नाही. यामुळे यूजर्स व्हॉट्सअपचे नवे अकाउंट बनवू शकणार नाहीत. सोबतच सध्याचे व्हॉट्सअप अकाउंट व्हेरीफाय सुद्धा करू शकणार नाहीत.
मोबाईल फोनसह 50 वस्तू होणार महाग
1 फेब्रुवारी 2020ला मोदी सरकार आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. सरकार घरगुती इंडस्ट्रीला बूस्ट देण्यासाठी कमीत कमी 50 वस्तूंवर आयात शुल्क वाढवू शकते. जर सरकारने अर्थसंकल्पात आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला तर इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल गुड्स, केमिकल्स आणि हँडीक्रॉफ्ट वस्तू महाग होऊ शकतात. मोबाईल फोन चार्जर, इंडस्ट्रियल केमिकल, लँप, लाकडी फर्निचर, कँडल, आर्टिफिशयल ज्वेलरी आणि हँडीक्राप्टचे आयटम महाग होऊ शकतात. यासोबतच मोबाइल फोनच्या किमतीतही वाढ होऊ शकते.
घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात बदल होऊ शकतो
1 फेब्रुवारीला घरगुती गॅसच्या दरात बदल होतो. याशिवाय एयर टर्बाइन फ्यूअलचे दरही बदलू शकतात. अंतरराष्ट्रीय स्तरावर गॅसच्या किमतीमधील बदलाचा परिणाम स्थानिक बाजारावर होऊ शकतो. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती गॅस आणि विमान इंधन दर बदलतात.
संपावर असतील बँक कर्मचारी
आपल्या मागण्यांसाठी देशभरातील बँक कर्मचारी 1 फेब्रुवारीपासून संपावर असणार आहेत. कर्मचारी संघटना टप्याटप्याने संप करण्याच्या तयारीत आहेत. पहिल्या टप्प्यात कर्मचारी दोन दिवसांचा संप करणार आहेत. ज्या दिवशी अर्थमंत्री देशाचा अर्थसंकल्प सादर करतील, तेव्हा बँक कर्मचारी संपावर असणार आहेत.
Visit : bahujannama.com