गुजरात : वृत्तसंस्था – भारतात सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान तयार झाले असून गुजरातमधील या मैदानाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. येथील अहमदाबादमधील ‘सरदार वल्लभभाई पटेल क्रिकेट स्टेडियम’चा कायापालट केला असून एकाचवेळी आता १ लाख १० हजार प्रेक्षक यात बसू शकतात. या स्टेडियमचे उदघाटन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्राम यांच्या हस्ते होणार असून ट्रम्प यांचे स्वागतही करण्यासाठी मोठ्या रोड शोचे आयोजन केले आहे.
त्यांच्या या मार्गात येणाऱ्या झोपडपट्टीला झाकण्यासाठी मध्ये भिंत उभारली आहे. स्टेडियमवर ह्यूस्टनमधील ‘हाउडी मोदी’ मेळाव्याच्या धर्तीवर ‘केम छो ट्रम्प’ मेळावा होणार असून या मेळाव्याला लाखो लोकांची उपस्थिती राहणार आहे. ट्रम्प हे २४ फेब्रुवारी रोजी रोजी अहमदाबादला येणार असून त्यांच्या पाहुणचारासाठी अहमदाबाद विमानतळ ते साबरमती आश्रम या दहा किमीच्या रस्त्यावरून ट्रम्प यांचा रोड शो होणार आहे. त्यात अनेक भारतीय सहभागी होणार आहेत.
या स्टेडियममध्ये ७६ कॉर्पोरेट बॉक्स, ४ ड्रेसिंग रुम, क्लब हाऊस आणि ऑलिम्पिकच्या दर्जाचे स्विमिंग पूल आहेत. मेलबर्न स्टेडियमचे डिजाईन बनवलेल्या आर्किटेक्त्त कंपनीनेच अहमदाबादमधील स्टेडियम उभारले आहे. तसेच या स्टेडियमच्या उभारणीसाठी १० कोटी रु. खर्च आला आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राउंड पेक्षाही हे स्टेडियम मोठे आहे.
एप्रिलमध्ये येथे पहिला सामना होणार असून हे स्टेडियम फक्त क्रिकेटपुरतेच नसून येथे हॉकी. बास्केटबॉल, कबड्डी, लॉन टेनिस, बॅडमिंटन, स्विमिंग यासाठीही ते वापरले जाणार आहे. तसेच तेथे सेंट्रल एसी आणि दिव्यांगांसाठी विशेष सुविधा केली जाणार आहे. त्याची पार्किंग व्यवस्था तीन हजार कार आणि दहा हजार दुचाकी पार्क होतील. अहमदाबाद येथील सध्याचे मोटेरा स्टेडियम १९८२ साली बनवण्यात आले होते.