नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर सर्व काही ठिक होत असेल तर येत्या 30 सप्टेंबर रोजी मोबाईल नंबरच्या एका ऑपरेटरमधून दुसऱ्या ऑपरेटरमध्ये पोर्ट करणे पुन्हा एकदा स्वस्त होणार आहे. याला घेऊन टेलीकॉम रेगुलेटरी ऑथोरीटी ऑफ इंडिया (ट्राय) ने पुन्हा एकदा टेली कम्युनिकेशन मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीवर पोर्ट ट्रॅन्जॅक्शन चार्ज अँड डिपिंग चार्ज अमेंडमेंट रेगुलेशन 2019 चा ड्राफ्ट जारी केला आहे. या ड्राफ्टवर ट्रायने सर्व भागधारकांकडून 23 ऑगस्ट पर्यंत सूचना मागितल्या आहेत.
5.74 रुपये एमएनपी चार्ज
ट्रायने जारी केलेल्या नवीन ड्राफ्टमध्ये पुन्हा एकदा मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी(एमएनपी) चार्ज 19 रुपयांनी घटून 5.74 रुपये करण्याची शिफारस केली आहे. 31 जानेवारी 2018 रोजी ट्रायने एमएनपी चार्ज 19 रुपयांनी कमी करत 4 रुपये केला होता. ट्रायच्या या निर्णयाविरोधात टेलीकॉम ऑपरेटर दिल्ली हायकोर्टात गेले होते. 8 मार्च 2019 रोजी दिल्ली हायकोर्टाने ट्रायच्या निर्णयाला नकार दिला. यानंतर पुन्हा एकदा टेलीकॉम ऑपरेटर एमएनपीसाठी19 रुपये चार्ज घेत होते. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ट्रायने एमएनपी चार्जला घेऊन पुन्हा एकदा नवीन ड्राफ्ट जारी करत 5.74 रुपये फी ठेवली आहे. जर सगळं ठिक झालं तर ट्रायचा हा नियम 30 सप्टेंबर 2019 पासून लागून होणार आहे.
काय आहे एमएनपी ?
ग्राहकांना नंबर न बदलता इतर कंपनीच्या सेवेचा लाभ घेता यावा यासाठी ट्रायने मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीची सुविधा सुरु केली. यासाठी सुरुवातीचा चार्ज 19 रुपये इतका होता. यासाठी मेसेजमध्ये तुम्हाला PORT असं लिहून स्पेस देत जो नंबर पोर्ट करायचा आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे. हा मेसेज 1900 या नंबरवर पाठवायचा आहे. ज्या नबंरला पोर्ट करायचं आहे त्यावरून हा मेसेज पाठवायचा आहे. यासाठी 4 ते दिवसांचा कालावधी लागतो.