मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रात (Maharashtra) नवीन मद्यविक्री परवाने (New Liquor Licence) देण्याची सध्या बंदी आहे. परंतु मुंबईमधील विमानतळ (Mumbai Airport) ठिकाणी परवाने देण्याची जी बंदी आहे, ती बंदी उठवण्याच्या हालचाली राज्य सरकार करीत आहे. तर पंजाब (Punjab), दिल्ली (Delhi) राज्यातील मद्य नियमावलीनुसार विमानतळांचा (Mumbai Airport) पुनर्विकास करणाऱ्या जीव्हीकेने राज्याच्या गृह विभागाला (state Home Ministry) विमानतळावर मद्यविक्री परवाने (New Liquor Licence) देण्याबाबत पत्राद्वारे माहिती दिल्याचे कळते आहे. म्हणून आगामी दोन दिवसीय होणाऱ्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मुंबईबरोबरच महाराष्ट्रातील मद्य नियमावलीमध्ये बदल होणार असल्याची शक्यता आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
जिव्हिकेने पंजाब (Punjab)आणि दिल्लीच्या (Delhi) विमानतळावरील (Mumbai Airport) मद्यविक्रीच्या नियमावलीनुसार मुंबई मधील विमानतळावर मद्य विक्री परवाने देण्याचे कारण काय आहे असं देखील समजावून सांगितलं आहे. तसेच, महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर असे मद्यविक्री परवाने देण्याची मागणी देखील केली जात आहे. त्याचप्रमाणे राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त कांतिलाल उमप (Kantilal Umap) यांनी देखील याअगोदर 14 मे 2021 रोजी गृहविभागाच्या प्रधान सचिव वल्सा सिंह नायर (Principal Secretary Valsa Singh Nair) यांना याबाबत प्रस्ताव पाठविला असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, उत्पादन शुल्क आयुक्त कांतिलाल उमप (Kantilal Umap) यांनी त्या पाठविलेल्या प्रस्तावामध्ये म्हटलं होत की, विमानतळावर नवीन मद्य विक्री परवाने दिल्यास मद्य विक्रीवरील शुल्क अधिक प्रमाणात आकारता येईल याव्यतिरिक्त राज्याचा महसूल वाढण्यात मदत होणार आहे. म्हणून येत्या दोन दिवसीय अधिवेशनात मुंबईबरोबरच राज्यातील मद्य नियमांमध्ये बदल केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यतः म्हणजे, मुंबईसह राज्यातील मद्य नियमांमध्ये बदल करण्याबाबत गृहविभागाच्या प्रधानसचिव वल्सा नायर (Principal Secretary Valsa Singh Nair) आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप (Kantilal Umap) यांना प्रतिक्रिया मागितली असता पण त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया मिळाली नाही.
Web Titel : new liquor licence maharashtra liquor rules may change by state government
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Bandatatya Karadkar News | बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
Supreme Court | विधानपरिषदेच्या निवडीचे आदेश राज्यपालांना देणार नाही – सुप्रीम कोर्ट
Mahavitaran News | वीज ग्राहकांना दिलासा ! शासकीय वीज कंपन्यांना कर आकारणीतुन वगळले