New Gold Hallmark | सोने खरेदी-विक्रीच्या नियमात आजपासून होणार बदल; नवीन हॉलमार्क होणार लागू

बहुजननामा ऑनलाईन – New Gold Hallmark | आजपासून सोने खरेदी-विक्रीच्या नियमांत बदल होणार आहेत. या नियमांनुसार आता हॉलमार्कशिवाय (New Gold Hallmark) कोणतेही दागिने बाजारात विकता येणार नाहीत. तसेच आजपासून सहा अंकी हॉलमार्क नियमही लागू करण्यात आला आहे. या सगळ्यामुळे लोकांच्या जीवनावर याचा मोठा परिणाम होणार आहे. चला तर मग जाणून घ्या या नव्या नियमाचा लोकांवर काय परिणाम होणार आहे ते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हॉलमार्कशिवाय सोने (Gold) खरेदी करता येणार नाही
नव्या नियमानुसार आता दागिन्यांची खरेदी- विक्री करणाऱ्या दुकानदाराला हॉलमार्कशिवाय सोने विकता येणार नाही. जर त्याने हॉलमार्कशिवाय सोने विकले तर त्याला दंड (Fine) होऊ शकतो.
सर्वसामान्यांना काय फायदा होणार?
हॉलमार्कच्या नव्या नियमांमुळं लोकांची होणारी फसवणूक (Fraud) कमी होण्यास मदत होईल. तसेच दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोने आहे हेदेखील सर्वसामान्य लोकांना समजेल. (New Gold Hallmark)
नवीन हॉलमार्क
सरकारने 2021मध्ये सहा अंकी हॉलमार्क क्रमांक आणला होता. तेव्हापासून बाजारात जुने आणि नवे दोन्ही हॉलमार्क सुरू होते.
नवीन हॉलमार्क हा जुन्यापेक्षा सुरक्षित असल्याने सध्या तो आजपासून अनिवार्य करण्यात आला आहे.
सोन्याची बिस्किटे आणि नाण्यांसाठीही नियम लागू
केवळ सोन्याच्या दागिन्यांवरच नव्हे तर सोन्याच्या बिस्किटे (Golden Biscuits) आणि नाण्यांसाठीही हा नवीन हॉलमार्क नियम
जारी करण्यात आला आहे. सोन्याची पारदर्शकता किती आहे हे या नवीन हॉलमार्कच्या नियमांवरून समजणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जुन्या सोन्याचे काय होणार?
जर तुमच्याकडे जुने सोने असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.
ग्राहक जुने हॉलमार्क असलेले दागिने सहज विकू शकतात असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Web Title :- New Gold Hallmark | new hallmark will be implemented from 1 april 2021 gold buying and selling rules will change
हे देखील वाचा :
IPL 2023 | आज रंगणार आयपीएलचे डबल हेडर सामने; ‘हे’ 4 संघ भिडणार आमने-सामने
Buldhana Crime News | 26 वर्षीय तरुणीचा ट्रेनमधून पडून दुर्दैवी मृत्यू; बुलढाणामधील घटना
Ratnagiri News | सभेवरून परतल्यानंतर माजी ग्रामपंचायत सदस्येने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल
Comments are closed.