नवी दिल्ली : वृत्तसंस्था – येत्या २० मार्चला निर्भयाच्या चारही दोषींना फाशी होणार असून दोषींमधील मुकेश सिंहने दिल्ली कोर्टात याचिका दाखल करत नवीन डाव साधला आहे. मुकेशने आपले वकील एमएल शर्मा यांच्याकडून दिल्लीच्या कोर्टात याचिका दाखल करत दावा केला आहे की, तो निर्भयासोबत १६ डिसेंबर २०१२ ला झालेल्या घटनेदरम्यान दिल्लीमध्येच नव्हता. अशात घटनास्थळी म्हणजे दिल्लीच्या वसंत विहारमध्ये हजर नव्हता. यासह मुकेशने तिहार तुरुंगात छळ केल्याचाही आरोप लावला आहे. तर एकीकडे याचिकेवर सुनावणीनंतर कोर्टाने आपला निर्णय सुरक्षित ठेवला आहे.
A Delhi Court reserves order on plea of one of convicts in 2012 Delhi gangrape case, Mukesh seeking quashing of death penalty claiming that he was not in Delhi when the gangrape incident took place.
— ANI (@ANI) March 17, 2020
मुकेशने चालवला आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव
आश्चर्याची गोष्ट ही आहे कि मुकेशने हा डाव आगामी २० मार्चला होणाऱ्या फाशीच्या ३ दिवस पहिले केला आहे. प्रश्न असाही आहे कि आता त्याने अशी याचिका कोर्टात का दाखल केली नाही की, तो घटनास्थळी किंवा घटनेच्या दिवशी दिल्लीत नव्हता.
यअगोदर सोमवारीच सर्वोच्च न्यायालयाने दोषी मुकेश सिंहच्या त्या याचिकेला फेटाळले आहे, ज्यात त्याने सुधारित याचिका आणि दया याचिका पुन्हा वापरण्याची मागणी केली होती. त्याने म्हटले होते कि त्याचे माजी वकील वृंदा ग्रोवरने त्यांना दगा देत सुधारित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, जी फेटाळली गेली होती. मुकेशवर विश्वास ठेवला तर त्याच्या वकिलांनीही हे लपवून ठेवले होत कि सुधारित याचिका दाखल करण्यास तीन वर्षाचा कालावधी असतो.