नवी दिल्ली वृत्तसंस्था : प्रेमी युगुलांना अनेकदा एकांतात वेळ घालण्यासाठी एखादे निर्जन स्थळ शोधावे लागते. ज्यामुळे इतरांना आणि त्यांना स्वतःला त्रास होणार नाही. परंतु सध्या सोशल मीडियावर वायरल होणाऱ्या एका फोटो मुळे चक्क रेल्वे मंत्रालयालाच या प्रकारची दाखल घेणे भाग पडले आहे.
ज्यामध्ये रेल्वे रुळावर एक मालगाडी उभी आहे आणि याच मालगाडीच्या सावलीचा आधार घेत एक जोडपे रेल्वे रुळावर बसल्याचा फोटो सोशल मीडिया वर वायरल होत आहे. आपण आपला जीव धोक्यात टाकत आहोत याची कल्पना पण या प्रेमी युगुलाला नसावी , यामुळे रेल्वे विभागालाच या प्रकरणाची दखल घ्यावी लागली. रेल्वे मंत्रालयाने ट्विट करत, असा प्रकार धोकादायक आणि बेकायशीर असल्याचं सांगितलं आहे.
मंत्रालयाने सांगितले कि, ‘कृपया करून अश्या प्रकारे मालगाडी उभी असताना अश्या पद्धतीने रेल्वे रुळावर बसू नये , कारण मालगाडी कोणतीही पूर्व सूचना न देता कधीही चालू होऊ शकते. ज्यामुळे तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो. रेल्वे फाटकातूनच प्रवास करावा.अलर्ट राहा, सुरक्षित राहा.’ दरम्यान, रेल्वे ट्रकचे जाळे संपूर्ण जगात पसरले आहे. अनेकदा सूचना देऊनही घाईगडबडीत अनेक जण रेल्वे रुळ ओलांडतात. जेणेकरून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.
This is Dangerous and a punishable offence ! Please never try to reach under any stationary wagon or coach. It may move without giving any warning. Cross Railway track only from authorised locations. STAY ALERT STAY SAFE !!! pic.twitter.com/vqRkjhMqJW
— Ministry of Railways (@RailMinIndia) August 27, 2019