मुंबईः बहुजननामा ऑनलाईन – काश्मीरमधील कलम ३७० हटविल्यानंतर बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर हिने केलेल्या वक्तव्याला युजर्सने ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनेक युजर्सने तिला कमेंट केल्या आहेत. काही युजर्सने तिला पाकिस्तानचा रस्ता दाखवून तिकडे पहायला जाण्याचा सल्ला दिला आहे.
नुकत्याच काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर या निर्णयाचे देशभरात स्वागत करण्यात आले. मात्र, बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर मुलाखतीमध्ये म्हणाली की, काश्मीरबाबतची सध्याची स्थिती मन हेलावून टाकणारी आहे. परंतू, मी देशभक्त आहे. तिच्या या वक्तव्यानंतर युजर्सने तिला ट्रोल करण्यात सुरुवात केली.
एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री सोनम कपूर म्हणाली की, ‘सध्या मी शांत राहणे योग्य आहे कारण ही वेळ निघून जाईल. आपला देश 70 वर्षापूर्वी एकसंध होता आणि सध्याचे विभाजनशील राजकारण पाहून मन हेलावून जाते. सध्या हे प्रकरण खूपच गुंतागुंतीचे झाले आहे. मला यामधील फारसे काही माहित नाही. सगळीकडे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या विरोधी बातम्या असल्यामुळे मला काहीच कळत नाही. सध्या परिस्थितीत शांतता ठेवणे आणि काय घडत आहे ते पाहणे हे मला योग्य वाटते. जेव्हा माझ्याकडे संपूर्ण माहिती असेल तेव्हा मी यावर माझे मत मांडू शकेल.’ पुढे सोनम कुटुंबाचे नाते पाकिस्तानशी कसे जोडले यावर म्हणाली की, ‘मी सिंधी असल्याबरोबर पेशीवरीसुद्धा आहे. मात्र, सोनम कपूरच्या या विधानावर युजर्सने टिका करण्यास सुरुवात केली आहे व तिला ट्रोल केले आहे.’