बहुजननामा ऑनलाईन टीम : भारत सरकारने जाहीर केलेल्या देशाच्या नवीन राजकीय नकाशाबद्दल नेपाळने बुधवारी निषेध नोंदविला आहे. नेपाळने जारी केलेल्या अधिकृत निवेदनातून भारताच्या नवीन नकाशात कालापानी प्रदेश समाविष्ट करण्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. सीमेवरील वादासाठी नवी दिल्ली आणि काठमांडू दरम्यान चर्चा सुरू आहे. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी दिलेल्या निवेदनात स्पष्ट केलं कि, “कलापानी नेपाळचा अविभाज्य भाग आहे, नेपाळच्या आंतरराष्ट्रीय सीमेचे रक्षण करण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत आणि त्यासाठी आम्ही अनुकूल देशांशी राजनैतिक चर्चेचा मार्ग स्वीकारू.
यावर मार्ग काढण्यासाठी दोन्ही देशाच्या परराष्ट्र सचिवांना यासंदर्भात चर्चा करण्याची जबाबदारी दिली आहे. दरम्यान भारताने दोन दिवसांपूर्वी जम्मू -काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून नवीन नकाशा जाहीर केला. परंतु या नकाशात उत्तराखंड परिसरात कालापानी परिसर समाविष्ट केल्याने नेपाळने नाराजी वक्त केली आहे. कारण नेपाळ कालापानी या ठिकाण्याला दरचूला या जिल्यात दाखवत असतो. नेपाळच्या या वक्तव्याव्यानंतर भारताकडून कोणतीही प्रतिकिया देण्यात आलेली नसून भारत – नेपाळ संबंध जपण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं समजते आहे.
दरम्यान परंतु याआधी पाकिस्ताननेदेखील या नकाशाववर आक्षेप दर्शविला होता. त्यांच्या ताब्यातील गिलगिट-बाल्टिस्तान आणि इतर भाग भारतीय नकाशात दाखविल्याने पाकिस्तानने विरोध दर्शविला होता. भारताने प्रसिद्ध केलेल्या नकाशा अवैध असून आम्ही त्याच्या विरोध डार्वित असल्याचं पाकिस्तानने म्हंटले आहे.
Visit : bahujannama.com