मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– Neil Kirit Somaiya | युद्धनौका ‘विक्रांत’साठी (INS Vikrant) जमा करण्यात आलेल्या पैशांमध्ये अपहार केल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे सुपुत्र नील सोमय्या (Neil Kirit Somaiya) यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता सोमय्या पिता – पुत्रांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
एका माजी सैनिकाच्या तक्रारीनंतर सोमय्या पिता -पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात पोलीस दोघांनाही अटक करण्याची शक्यता होती. त्यातच आता किरीट सोमय्यांच्या पाठोपाठ मुलगा नील सोमय्यांचाही (Neil Kirit Somaiya) अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्याने सोमय्या कुटुंबांला मोठा धक्का बसला आहे.
किरीट सोमय्या हे दोन दिवस गायब होते, मात्र आज त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे येत आपली प्रतिक्रिया दिली.
ठाकरे सरकारमधील (Thackeray Government) घोटाळेबाजांवर कारवाई होईपर्यंत सोमय्या झुकणार नाही ना मागे हटणार नाही.
आता आम्ही हाय कोर्टामध्ये (Mumbai High Court) सर्व मांडणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, 13 तारखेला म्हणजेच उद्या कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मात्र ते हजर राहिले नसल्याने त्यांना स्मरण देणारी नोटीस मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेच्या (Mumbai Police Financial Crime Branch) अधिकाऱ्यांनी लावली आहे.
सोमय्या आता चौकशीसाठी हजर राहतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Web Title :- Neil Kirit Somaiya | kirit somaiyas son neil somaiyas anticipatory bail plea rejected by court
हे देखील वाचा :
Pune Crime | पनवेलमध्ये फसवणूक करुन पुण्यात पळून आलेला तोतया पोलीस गुन्हे शाखेकडून गजाआड
Silver Oak Attack Case | ‘त्यांना’ ‘सिल्व्हर ओक’वरील हल्ल्याची माहिती होती’; भाजपचा खळबळजनक आरोप !