Neeraj Chopra | सुवर्णपदक विजेत्या नीरजने घेतले पुण्यात प्रशिक्षण

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – भारताचा भालाफेकपटू (javelin throw) नीरज चोप्राने (Neeraj Chopra) टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) आज इतिहास रचत सुवर्णपदकाला गवसणी घातली. निरज चोप्राने (Neeraj Chopra) भारताला 13 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये हे सुवर्णपदक मिळाले आहे. सुवर्ण पदकावर नाव कोरणाऱ्या नीरज चोप्राने पुण्यातील आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट (Army Sports Institute, Pune) येथे प्रशिक्षण घेतले आहे. दक्षिण मुख्यालय प्रमुख लेफ्टनंट जनरल जे एस नैन यांनी सुभेदार निरज चोप्रा (Neeraj Chopra) यांचे कौतुक केले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सुभेदार चोप्रा यांनी 87.58 मीटर थ्रोसह ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक अँड फील्ड गोल्ड जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू बनून इतिहास रचला आहे. तसेच मूळचा हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावातील शेतकरी कुटुंबातील आहे. त्यांना 26 ऑगस्ट 2016 रोजी भारतीय लष्करात नायब सुभेदार पदावर कनिष्ठ कमिशन अधिकारी (Junior Commission Officer) म्हणून समाविष्ट करण्यात आले.
नीरज यांना त्यांच्या गुणवत्तेच्या सेवेसाठी 2018 मध्ये अर्जुन पुरस्कार (Arjuna Award) आणि 2021 मध्ये विशिष्ठ सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले. लेफ्टनंट जनरल नैन यांनी यांनी चोप्रा यांच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल भारतीय लष्कर आणि संपूर्ण राष्ट्राला त्यांचा संपूर्ण राष्ट्राला त्यांचा अभिमान वाटत असल्याची भावना नैनी यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, निरजला हरियाणा सरकारच्या पॉलिसीनुसार 6 कोटी रुपये आणि क्लास -1 नोकरी दिली जाईल.
तसेच खेळाडूंसाठी आम्ही पंचकुलामध्ये कौशल्य केंद्र उभारत आहोत,
या केंद्रावर आम्ही निरज चोप्राची इच्छा असेल तर त्याला प्रमुख म्हणून नियुक्त करु.
तसेच त्याला इतर खेळाडूंप्रमाणे 50 टक्के सवलतीमध्ये जमीन विकत घेता येईल,
अशी घोषणा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी केली आहे.
Web Title :- Neeraj Chopra | Gold medalist Neeraj trained in Pune
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Gold Medal in Olympics | हरियाणाच्या सुपुत्राने घडवला इतिहास, वाचा Neeraj Chopra ची पूर्ण प्रोफाईल
Tokyo Olympic 2020 | भारताचा स्टार भालाफेक नीरजने लिहीला सुवर्ण इतिहास
Tokyo Olympics | 6 कोटी रुपये अन् क्लास-1 नोकरी, गोल्डमॅन नीरजला आणखी काय काय मिळणार?
Comments are closed.