मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – एकेकाळी एंटरटेनमेंट मॅग्झीनच्या सर्वात मोठ्या गॉसिप्समध्ये राहणारी अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) अलिकडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मोठ्या कालावधीनंतर ’बधाई हो’ चित्रपटातून सिनेमात परतलेली नीना गुप्ता (Neena Gupta) सध्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने आपली ऑटोबायोग्राफी(Autobiography) ’सच कहूं तो’ (Sach Kahun Toh) मध्ये आपल्या वैयक्तिक जीवनाबाबत अनेक खुलासे केले आहेत.
नीनाने या ऑटोबायोग्राफीत (Autobiography) अनेक खुलासे केले आहेत.
जे ऐकल्यानंतर विश्वास ठेवण्यास काही वेळ लागू शकतो.
नीनाची ऑटोबायोग्राफी ’सच कहूं तो (Sach Kahun Toh)’ करीना कपूर खानने व्हर्च्युअली लाँच केली.
या दरम्यान तिने फिल्ममेकर आणि अभिनेता सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्याशी संबंधीत एक खास किस्सा शेयर केला आहे.
नीना गुप्ताने सांगितले ’स्वर्ग’ चे सह-अभिनेते सतीश कौशिक यांनी त्यावेळी लग्नाचा प्रस्ताव दिला होता, ज्यावेळी ती प्रेग्नंट होती.
सतीश तिच्या होणार्या बाळाला सुद्धा स्वीकरण्यास तयार होते परंतु नीनाने सतीश यांचे प्रपोजल नाकारले.
आपली ऑटोबायोग्राफी ’सच कहूं तो’ मध्ये नीना गुप्ताने खुलासा केला आहे.
की, सतीश कौशिक यांनी नीनाला म्हटले होते की, जर तिचे बाळ डार्क स्किनचे जन्माला आले तर ती सांगू शकते की, हे मुल त्यांचे आहे आणि दोघे लग्न करू.
कुणाला याबाबत समजणार नाही.
मात्र, नीनाने त्यावेळी एकटी राहण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या मुलीचे पालन-पोषण एकटीने केले.
नीना गुप्ताने ’सच कहूं तो’मध्ये कास्टिंग काऊचबाबत सुद्धा लिहिले आहे.
याशिवाय फिल्म इंडस्ट्रीमधील पॉलिटिक्स, प्रेग्नंसी आणि सिंगल पॅरंटहुडबाबत सुद्धा तिने लिहिले आहे.
कृपया हे देखील वाचा:
Coronavirus in India | देशात 24 तासात सापडल्या 62224 कोरोना केस, 2542 रूग्णांचा मृत्यू
Anti-Corruption Bureau | 40 हजाराची लाच घेणारा सरपंच ACB जाळ्यात; आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा
राज्यातील ‘या’ 6 जिल्ह्यांत कोरोनाचा धोका कायम; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा
Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक