नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका १६ वर्षाच्या मुलावर माशाने इतका जोरदार हल्ला केला की त्याच्या मानेमध्ये छिद्र तयार झाले. या माशाचा हलला इतका जबरदस्त होता की काही वेळातच या मुलाचा जीव गेला असता.
ही बाब इंडोनेशियाची आहे. सुलवेसी प्रांतात आपल्या पालकांसह मासेमारी करत असताना फ्लाइंग नीडल फिशने मोहम्मद इदुलवर हल्ला केला.
तेवढ्यात अचानक एक मासा उडला आणि त्याने इदुलच्या मानेवर हल्ला केला. एका वृत्तानुसार ही घटना शनिवारची आहे.
अपघातानंतर इडुल याला लवकरच रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेच्या दोन दिवसानंतर त्याच्या मानेवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फोटोंमध्ये हे स्पष्ट झाले आहे की मासा इदुलच्या मानेच्या आरपार गेला आहे.
इडुलची प्रकृती आता सुधारत आहे, पण आत्ता त्याला हॉस्पिटलमध्येच रहावे लागेल. डॉक्टरांना आशा आहे की लवकरच त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्यास सुरवात होईल.