पुणे : बहुजननामा ऑनलाइन – NDA Cadet Dies in Pune | पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत शनिवारी प्रशिक्षणादरम्यान एका कॅडेटचा (NDA Cadet Dies in Pune) मृत्यू झाला. कॅडेट मोहम्मद सुलतान अहमद Mohd Sultan Ahmed (वय 21) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. हा कॅडेट मालदीव (Maldives) येथील असून पुण्यातील एनडीएत (Pune NDA) सध्या तो प्रशिक्षण घेत होता.
Cadet Mohd Sulthan Ahmed of Maldives collapsed during an organized training activity at the National Defence Academy today. Despite best efforts the cadet could not be revived. A post mortem will be conducted to ascertain the cause of death: National Defence Academy (NDA), Pune
— ANI (@ANI) September 25, 2021
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत शनिवारी जोश रन चे (Josh Run) आयोजन करण्यात आले होते. ही 12 किमी धावण्याची स्पर्धा होती. त्यात मोहम्मद सहभागी झाला होता. धावताना त्याला चक्कर आल्यासारखे वाटले आणि तो कोसळला (Collaps). त्याला तातडीने एनडीएच्या रुग्णालयात (NDA Hospital) नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू (NDA Cadet Dies in Pune) झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
A Court of Inquiry has been ordered to investigate the incident. The Maldivian Embassy has been informed, and a report of the incident has been initiated with the appropriate Police Authority: National Defence Academy (NDA), Pune, Maharashtra
— ANI (@ANI) September 25, 2021
मोहम्मद हा 12 मार्च रोजी एनडीएच्या 145 व्या तुकडीत दाखल झाला होता. या प्रकरणी एनडीए प्रशासनातर्फे चौकशी समिती नेमण्यात आली आहे. तसेच मालदीव वकिलातीला या घटनेची माहिती देण्यात आली आहे. त्याच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कर करण्यात येणार असल्याची माहिती एनडीए प्रशासनाने दिली.
All arrangements are being made to provide a befitting send-off to the deceased with appropriate Military Honours, in consultation with the Maldives Embassy: National Defence Academy (NDA), Pune, Maharashtra
— ANI (@ANI) September 25, 2021
शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार असल्याचे पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड (DCP Purnima Gaikwad) यांनी सांगितले. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar Police Station) कलम 174 नुसार नोंद करण्यात आली आहे.
Web Title : NDA Cadet Dies in Pune |Maldives cadet dies while training at NDM in Pune
Rain in Maharashtra | राज्यात आगामी 5 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता
Nitin Gadkari | नितीन गडकरींची मोठी घोषणा; म्हणाले – ‘पुणे-सातारा महामार्गावरील टोल रद्द करणार’
Pune Crime | पुण्यात दुधामध्ये भेसळ ! अन्न औषध प्रशासनाकडून FIR दाखल