सातारा बहुजननामा ऑनलाईन – भाजपमध्ये गेलेले साताऱ्यातील आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्यासमोर कोणीही उमेदवार असला तरी मीच विजयी होणार असा निश्चय बोलून दाखवला आहे. परंतु त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादीचे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी शरद पवार यांनी सुत्रं हाती घेतली आहेत. परंतु शिवेंद्रराजेंच्या विरोधात राष्ट्रवादी कोणाला संधी देणार याकडे लक्ष लागलेले असताना शरद पवार यांनी मात्र आपल्याकडे तीन अर्ज पडून असल्याचे सांगितले. त्यामुळे तगडा उमेदवार देण्याचे पर्याय राष्ट्रवादीकडे उपलब्ध असल्याचे बोलले जात आहे.
शिवेंद्रराजेंविरोधात राष्ट्रवादीकडून तीन वेगवेगळ्या पर्यायांचा विचार सुरु आहे. असं सांगण्यात येत आहे. त्यापैकीच एक नाव म्हणजे उदयनराजेंच्या मातोश्री कल्पनाराजे यांच्या नावावरही विचार सुरु असल्याचे बोलले जात आहे. तर पहिल्या पर्यायाकडून नकार आल्यास उदयनराजेंचे समर्थक अमित कदम यांनाही रिंगणात उतरवले जाऊ शकते. तर तिसरा पर्याय म्हणजे शशिकांत शिंदे हेदेखील मैदानातही उतरवले जाऊ शकते. अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत.
दरम्यान शिवेंद्रराजेंनी पक्ष सोडल्यानंतर शरद पवारांनी ही जागा आम्हीच राखणार असल्याचे सांगितले. यापूर्वीही काही आमदारांनी पक्ष सोडला आहे. परंतु त्यातील एकही जण पुढील निवडणूकीत निवडून आला नाही. त्याप्रमाणेच यावेळीही ही जागा राष्ट्रवादी राखणार आहे. त्यामुळे मला चिंता नसल्याचे शरद पवार म्हणाले.