NCP president Sharad Pawar | केतकी चितळेने केलेल्या असभ्य टिकेवर शरद पवारांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले…

NCP president Sharad Pawar reply in one word about ketki chitale

मुंबई : बहुजननामा ऑनलाइनNCP president Sharad Pawar | अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketki Chitale) हिने देशातील ज्येष्ठ राजकीय नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP president Sharad Pawar) यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन असभ्य टीका सोशल मीडिया (Social Media) च्या माध्यमातून केली होती. यानंतर संपूर्ण राज्यातून तिच्या पोस्टवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आता खुद्द शरद पवार यांनी केतकीच्या त्या पोस्ट (Ketki’s Post) वर प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

केतकी चितळे हिने आक्षेपार्ह भाषेत सोशल मीडियावर एक कविता पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये तिने अतिशय खालच्या स्तरावर जाऊन राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यानंतर ती सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली. राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते यांनीही तिचा निषेध करत आहेत.

 

पुण्यातील राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी रुपाली ठोंबरे (Rupali Thombre Patil) यांनी तर तिच्या आई-वडिलांचे संस्कार कमी पडले असावेत. तिला दोन-चार फटके दिले पाहिजेत, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तसेच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पत्र पाठवून तिच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

या प्रकरणावर राज्यात ठिकठिकाणी निषेधाच्या प्रतिक्रिया उमटत असताना
खुद्द शरद पवार यांनीही याबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना या प्रकरणावर प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, कोण केतकी चितळे? ती मला माहित नाही.
तीने कोणती पोस्ट केली तेही मला माहित नाही. आणि जी गोष्टी मला माहित नाही त्यावर मी भाष्य करणार नाही,
असे म्हणत पवार यांनी केतकी चितळे हिच्यावर भाष्य करण्यास नकार दिला.

 

Web Title :- NCP president Sharad Pawar reply in one word about ketki chitale

 

हे देखील वाचा :

Health Tips | रिकाम्या पोटी ‘चहा’ पिता का?; चांगलं की वाईट? जाणून घ्या सविस्तर

Nagpur Crime | नागपूरमध्ये सेक्स रॅकेट ! सापडल्या दिल्ली-मुंबईतील तरुणी; गुन्हे शाखेची कारवाई

Parbhani Crime | दुर्दैवी ! कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या 5 जणींचा बुडून मृत्यू; परिसरात हळहळ