कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा 80 वा वाढदिवस. यानिमित्त त्यांना देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांना कोल्हापुरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शरद पवार यांच्याविषयी बोलत असताना मुश्रीफ भाऊक झाले.
कोल्हापुरातही शाहू सांस्कृतिक मंदिर येथून वाढदिवसानिमित्त व्हच्यूअल रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
यावेळी ते म्हणाले, मिरजेला जातीय दंगल झालीय. यात पश्चिम महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पराभूत झाले. मात्र, मी प्रचंड मतांनी विजयी झालो. राज्यात सत्ताही आली. यावर बोलताना शरद पवार यांनी माझ्या विजयावर समाधान व्यक्त केलं होतं. आमचा एक अल्पसंख्यांक कार्यकर्ता हसन मुश्रीफ या निवडणुकीमध्ये विजयी झाला आहे, याचा आनंद झाल्याचे पवार साहेबांनी सांगितले.
या आठवणी जाग्या करत असताना हसन मुश्रीफ भावूक झाले. अन् त्यांच्या डोळ्यातून पाणी आले. त्यामुळे संपूर्ण सभागृहही भाऊक झाले.