अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. हर एक पक्ष निवडणुकीची जय्यत तयारी करताना दिसत आहे. नेत्यांचे एकमेकांवर आरोप -प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारनेर मतदारसंघातील उमेदवारीचे दावेदार निलेश लंके यांनी विधानसभेचे उपसभापती शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्यावर गंभीर आरोप आहेत, ‘ औटी विकासकामांच्या नावाखाली ठेकेदाराकडून बळजबरीने कमिशन घेत आहेत असा घणाघात लंके केला. तसेच औटी यांचा कमिशन मागतानाचा व्हिडिओदेखील माझ्याकडे असून वेळ आल्यावर जनतेसमोर ठेवणार असे देखील निलेश लंके यांनी म्हंटले आहे.
निलेश लंके यांना राष्ट्रवादीकडून अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्या विरोधात उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. असे संकेत देखील राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीत पारनेर मतदारसंघातून उमेदवारीचे संकेत देताच निलेश लंके यांनी विजय औटी विरोधात जय्यत तयारी सुरु केली आहे. यावेळी भाळवणी येथे आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात लंके बोलत होते.
निलेश लंके यांनी ,आरोप करत सांगितले कि, पारनेर तालुक्यातील शिवसेना तालुकाप्रमुख आणि विजय औटी यांचा मी खंदे समर्थक मानले जातो.,मात्र माझ्या विरोधात औटी यांनीच कट कारस्थान करून शिवसेनेतून माझी हकालपट्टी केली होती. तसेच शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर औटी यांच्या विरोधात दंड थोपटत निलेश लंके यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेत विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे.