मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी चिंतामणी राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणपतीच्या दर्शनामुळे (Ganeshotsav) मनाला सुख आणि आनंद मिळतो असे म्हटले. तसेच मागील दोन वर्षे कोरोना (Corona) काळात कदाचित डॉक्टरांच्या रुपाने बाप्पा आपल्याकडे आले होते असेही सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी म्हटले. तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) निशाणा साधला. हे सरकार म्हणजे इव्हेंट आणि ईडीचं सरकार आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) पुढे म्हणाल्या, मागील दोन वर्ष कोरोना असला तरी बाप्पा सर्वांच्या मनात विराजमान होते. त्यामुळे सण साजरा करता आला नाही. परंतु मनातून, आपापल्या परीने, घरी त्यांचं स्वागत केलं. दोन वर्षे अडचणींची होती. पण डॉक्टर आणि यंत्रणा, संपूर्ण प्रशासनाच्या मदतीने आपण कोविड वर मात करु शकलो. दोन वर्षे कदाचित डॉक्टरांच्या रुपाने बाप्पा आपल्याकडे आले होते. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी याआधी देखील राज्य सरकारवर निशाणा साधला होता.
50 खोके ऑल ओके वाल्या या सरकारला सर्वसामान्यांची सेवा करण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी म्हटलं होतं.
सध्या असलेल्या सरकारमधील लोक कार्यक्रम सोडतील तर जनतेची सेवा करतील ना… हे एवढे सेलिब्रेशन (Celebration) करण्यात मग्न आहेत
की, बस्ता बांधला… त्यानंतर लग्न केलं… मात्र लग्नाचा अजूनही हनिमून सुरु आहे, असा टोला त्यांनी लगावला होता.
राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर एक महिन्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.
हे मायबाप सरकार आहे आलिया भोगासी असेच या सरकार बद्दल म्हणावे लागेल,
असाही टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला होता.
तसेच मूळ मुद्याला बगल देण्याची भाजपची (BJP) जुनी खेळी असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- NCP MP Supriya Sule | ncp leader and mp supriya sule slams cm eknath shinde and bjp devendra fadnavis
हे देखील वाचा :
Gold Rate Today | खुशखबर ! सोने-चांदीच्या दरात आज पुन्हा मोठी घसरण