NCP MP Mohammed Faizal | शरद पवारांना दिलासा, राष्ट्रवादीच्या खासदाराला पुन्हा सदस्यत्व बहाल

NCP MP Mohammed Faizal | ncp lakshadweep leader mohammed faizal lok sabha membership restored ahead of supreme court hearing'

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आलेली असताना शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. लक्षद्वीपचे (Lakshadweep) राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल (NCP MP Mohammed Faizal) यांची खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे. हत्येच्या गुन्ह्यात फैजल  यांना दोषी ठरवण्यात आले होते. त्यामुळे त्यांची खासदारकी 11 जानेवारी रोजी काढून घेण्यात आली होती.

 

राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेले मोहम्मद फैजल (NCP MP Mohammed Faizal) यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) होणाऱ्या सुनावणीपूर्वीच लोकसभा सचिवालयाने त्यांच्या अपात्रतेचा आदेश मागे घेतला. त्यामुळे फैजल यांना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

हत्येचा प्रयत्न (Attempted Murder) केल्या प्रकरणी फैजल यांना दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात
आली होती. त्यानंतर फैजल यांना अपात्र ठरवण्यात आले. मात्र केरळ उच्च न्यायालयाने (Kerala High Court)
25 जानेवारी रोजी त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली.

 

लोकसभा सचिवालयाने 13 जानेवारी रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, कावरट्टी येथील सत्र न्यायालयाने
(Kavaratti Sessions Court) हत्येचा प्रयत्नाच्या खटल्यात दोषी ठरवल्याच्या तारखेपासून
(11 जानेवारी 2023) फैजल यांना लोकसभेच्या सदस्यत्वापासून अपात्र ठरविण्यात आले होते.

 

 

Web Title :-  NCP MP Mohammed Faizal | ncp lakshadweep leader mohammed faizal lok sabha membership restored ahead of supreme court hearing

 

हे देखील वाचा :

Beed Crime News | माझं सगळ संपल माझ्या ताईला घेऊन जा असे म्हणत 13 वर्षांच्या मुलीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

IPS Mokshada Patil | लुटण्यासाठी सायबर भामट्यांचा नवा फंडा ! महिला IPS अधिकाऱ्याच्या नावाने बानावट ट्विटर अकाऊंट, देशातील अनेक IPS अधिकाऱ्यांना गंडा

CM Eknath Shinde On Pune BJP MP Girish Bapat | खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने सर्वसमावेशक, दिलदार नेतृत्व गमावले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रद्धांजली