पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पारनेर तालुक्यात शिवसेनेला रामराम ठोकत पारनेर नगरपंचायतीच्या पाच नगरसेवकांनी 4 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यानंतर शिवसेनेने पाच नगरसेवक परत द्यावेत असा निरोप अजित पवारांना पाठवला. यावर बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नगरसेवाकांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्याबाबतचा खुलासा केला आहे.
राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या पारनेरच्या पाच नगरसेवकांच्या बाबतीत भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, हे पाचही नगरसेवक दुसऱ्या पक्षात जाणार होते. त्याचा आघीडीवर दुष्परिणाम झाला असता म्हणून या पाचही नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यात आल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
भाजपचे नेते पोपट आणि शहामृग
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी इंधन दरवाढीवरून भाजप नेते आणि बॉलिवूड सेलिब्रिटींना घेरलेले असतानाच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही भाजपवर हल्ला चढवला आहे. रोहित पवार यांनी भाजप नेत्यांना थेट पोपट आणि शहामृगाची उपमा देऊन टीकास्त्र सोडले आहे.
#मविआ वर राजकीय टिका करताना पोपटासारखे बोलणारे राज्यातील BJPचे सर्व नेते सामान्यांसाठी महत्त्वाच्या इंधन दरवाढीवर मात्र न बोलता वादळात वाळूत तोंड खुपसून बसणाऱ्या शहामृगाच्या भूमिकेत जातात.
केंद्रात तुमचं काही चालत नाही की तिथं बोलायला घाबरता?याचं स्पष्टीकरण त्यांनी जनतेला द्यावं.— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 7, 2020
रोहित पवार यांनी ट्विट करून भाजप नेत्यांना इंधन दरवाढीवरून घेरलं आहे. महाराष्ट्र विकास आघाडीवर राजकीय टीका करताना पोपटासारखे बोलणारे राज्यातील भाजपचे सर्व नेते समान्यांसाठीच्या महत्त्वाच्या इंधन दरवाढीवर मात्र न बोलता वादळात वाळूत तोंड खूपसून बसणाऱ्या शहामृगाच्या भूमिकेत जातात. केंद्रात तुमचं काही चालत नाही की तिथं बोलायला घाबरता ? असा सवाल करतानाच मूग गिळून गप्प बसण्याचं स्पष्टीकरण जनतेला द्या, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.