मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मराठा आरक्षण आणि अन्य प्रलंबित मागण्या बाबत पंतप्रधानांच्या भेटीसाठी दिल्ली दौरा केला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची उद्धव ठाकरे यांनी वैयक्तिक भेट घेतली. यावरून राजकारणात विविध चर्चा रंगू लागल्या. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आदेश दिला तर आम्ही वाघाशीही दोस्ती करू असे भाष्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं होतं. वाघाशी कुणाची मैत्री होत नाही, मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असल्याचं शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर दिल. तर आता चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री (Chhagan Bhujbal) छगन भुजबळ यांनी चंद्रकांत पाटलांच्या (Chandrakant Patil) विधानावर प्रत्युत्तर दिलं आहे. भुजबळ म्हणाले, राज्याच्या अनेक प्रश्नांचे उत्तर केंद्राकडे आहे. त्यामुळे जमवून घ्यावे लागते. मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असते, वाघ पंजाही मारू शकतो,” असं सूचक विधान भुजबळ यांनी केलं आहे. या दरम्यान, आमची वाघाशी कधीही दुष्मनी नव्हती. उद्धव ठाकरे यांनी मोदींजींशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगितले. तसेच, फडणवीस आणि पाटील यांच्याशी जमत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. का ते माहीत नाही. पण इकडे जर वाघाशी दोस्ती असती तर 18 महिन्यांपूर्वीच सरकार आलं असतं. परंतु, पंतप्रधान मोदींनी आदेश दिला तर आम्ही वाघाशीही दोस्ती करू असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.
कृपया हे देखील वाचा:
IAS संजीव जयस्वाल यांचा लेटर बॉम्ब, केला ‘गोल्डन गँग’ बाबत गौप्यस्फोट !
Ratan Tata | 28 वर्षाच्या तरुणाकडून चक्क रतन टाटा घेतात ‘सल्ला’
दिलासादायक ! पिंपरी-चिंचवड शहरात आज 555 जण ‘कोरोना’मुक्त, 314 नवीन रुग्णांची नोंद
10 लक्षणांवरून जाणून घ्या मुलांना कोरोना झाला किंवा होणार आहे, लक्षणे समजताच ताबडतोब करा ‘ही’ 5 कामे
दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात 367 रुग्ण ‘कोरोना’मुक्त