नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत कामचुकार अधिकार्यांची खरडपट्टी काढली. कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झालेला असताना कामे का करत नाही, दहा दिवसात ही कामे मार्गी लावा, असे म्हणत त्यांनी अधिकार्यांना अल्टिमेटम दिला. भुजबळांचा रूद्रावतार पाहून अधिकार्यांची चांगलीच भंबेरी उडाली होती.
या बैठकीत अधिकार्यांना झापताना भुजबळ म्हणाले, 10 दिवसांनंतर पुन्हा एकदा बैठक बोलावून कामाचा आढावा घेणार आहे, त्यात जर हलगर्जीपणा दिसला तर थेट कारवाई होईल. मागच्या सरकारच्या काळात नेमके काय काम झाले हे उघड आहे. सगळे आकाशच फाटलेले आहे, कुठे कुठे ठिगळ लावायचे, असा उद्विग्न सवाल त्यांनी केला.
या बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, कृषी विभागाच्या प्रमुख अधिकार्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. काम न केल्यास थेट कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले, कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असताना, तो खर्चच होत नसल्याचे दिसून येताच भुजबळांनी रुद्रावतार दाखवला. यामुळे अधिकार्यांना चांगलाच घाम फुटला होता.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
- झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा