मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीपासून सुरु असलेले धक्के, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरही सुरुच आहे. परंतु मतदानाला काही दिवस बाकी असतांना राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. अजित पवारांचे निकटवर्तीय असलेले माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीला मतदानापूर्वीच आणखी दोन धक्के बसले. २००९ मध्ये ते राष्ट्रवादीकडून निवडून आले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या वडगावशेरी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदीश मुळीक हे आहेत. बापूसाहेब पठारे यांच्या भाजपप्रवेशावेळी जगदीश मुळीक हेसुद्धा उपस्थित होते. सोमवारी अजित पवार यांच्यासोबत रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्याला १२ तास होण्यापूर्वीच पठारे यांनी भाजपप्रवेश केला.
राष्ट्रवादीकडून पठारे हे वडगाव शेरी मतदारसंघात निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र, राष्ट्रवादीने सुनील टिंगरे यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या बापूसाहेब पठारे यांनी भाजपची वाट धरल्याचं म्हटलं जात आहे. वडगाव शेरी मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांच्यासमोरील मोठा अडथळा आता दूर झाला आहे.
Visit : bahujannama.com