बहुजननामा ऑनलाइन टीम : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी तालुक्यातील पांगारी येथील गोपीनाथ गडावर मुंडे समर्थकांचा मेळावा आहे. आज सकाळी ११ वाजता माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित राहून समर्थकांशी संवाद देखील साधणार आहे. तसेत, गडावर गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाच्या दर्शनासाठी भाजपा, शिवसेनेचे नेते येणार असल्याचे समजते.
याच दरम्यान गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही ट्विट करुन आप्पा गोपीनाथ काकांना जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. त्यांनी ‘आप्पा, तुमचाच वारसा चालवतो आहे. संघर्षाचा… जनसामान्यांच्या कल्याणाचा… सदैव आपल्या आठवणीत! जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन’ असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.
https://twitter.com/dhananjay_munde/status/1204924025253830656
धनजंय मुंडे यांनी याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे औरंगाबादमधील गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे काम जलग गतीने पूर्ण करण्याची घोषणा करावी अशी मागणी केली आहे. त्यांनी ही मागणी ट्विटच्या माध्यमातून केली होती. त्यांनी ट्विटमध्ये लिहले होते की, ‘सबंध आयुष्य शेतकरी, कष्टकरी, वंचित घटकांसाठी परिश्रम करणारे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांची उद्या जयंती आहे. यानिमित्ताने औरंगाबाद येथील स्व. मुंडे साहेब यांच्या स्मारकाचे काम जलद गतीने पूर्ण करण्याची घोषणा करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. ‘
सबंध आयुष्य शेतकरी, कष्टकरी, वंचित घटकांसाठी परिश्रम करणाऱ्या लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांची उद्या जयंती आहे. यानिमित्ताने औरंगाबाद येथील स्व. मुंडे साहेब यांच्या स्मारकाचे काम जलद गतीने पूर्ण करण्याची घोषणा करावी अशी मागणी मुख्यमंत्री @OfficeofUT यांच्याकडे केली. pic.twitter.com/DUadXd459k
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 11, 2019
आज राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने परळीत 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत स्वाभिमान सप्ताह साजरा आहे. धनंजय मुंडे यांनी यासंबंधी माहिती देताना सांगितले होते की, ‘पद्मविभूषण खासदार शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत स्वाभिमान सप्ताह साजरा केला जात आहे. पवार साहेब यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यात गझलनवाज भिमराव पांचाळे यांच्या बहारदार गझलांचा कार्यक्रम तसेच संगीत क्षेत्रातील कलाकारांचा गौरव करण्यात येणार आहे.’
Visit : bahujannama.com