मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हे वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर आले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हे पहिल्यांदाच वर्षा बंगल्यावर आले आहेत. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे (Thackeray group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे परदेशात असताना शरद पवार वर्षा बंगल्यावर शिंदे यांच्या भेटीसाठी गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
एकीकडे महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) जागावाटपाच्या चर्चा सुरु आहेत, तर दुसरीकडे शिंदेंची शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्येही (BJP) जागावाटपावरुन चर्चा होत आहेत. त्यातच शरद पवार हे अचानक एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहोचले आहेत. या भेटीमागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात भेटीगाठी वाढल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray)
यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाली. मात्र ही भेट अराजकीय असल्याचे फडणवीसांनी सांगितले होते.
Web Title : NCP Chief Sharad Pawar | Sharad Pawar Meet CM Eknath Shinde at varsha bungalow
- Shasan Aplya Dari | ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत कृषि विभागाच्या विविध योजना
- Police Viral Video | समृद्धी महामार्गावर पोलिसांची ‘समृद्धी’, पोलिसांच्या वसुलीचा व्हिडिओ दानवेंकडून ट्विट (व्हिडिओ)
- ACB Trap News | दीड लाखाची मागणी करून 50 हजाराची लाच घेणार्या महिला नायब तहसीलदार अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
- Adv Krupal Paluskar | केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यपदी पुण्यातील ॲड. कृपाल पलूसकर यांची निवड
- Chandrashekhar Bawankule | ‘मी भाजपची, पण पक्ष थोडीच माझा आहे’, पंकजा मुंडेच्या विधानावर बावनकुळे म्हणाले- ‘पंकजाताई भाजप…’
- Maharashtra Politics News | ‘नाहीतर राजकारणातून संन्यास घ्या’, पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ विधानावर ठाकरे गटाचा खोचक सल्ला