बहुजननामा ऑनलाइन टीम : आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा वाढदिवस आहे. ते आज ८० व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यांचा हा वाढदिवस राष्ट्रवादीकडून बळीराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा केला जात आहे. राष्ट्रवादीने त्यांच्या अधिकृत हॅंडलवरून आजचा दिवस बळीराजा कृतज्ञता दिन असा उल्लेख केला आहे.
वाढदिवसाचे औचित्य साधून शरद पवार आज सकाळी १०.३० ते १ दरम्यान मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. शरद पवार यांनी वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते आणि त्यांचे चाहते मुंबईत दाखल होत आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भावनिक ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहे.
प्रिय बाबा,
तुम्ही आमच्यासाठी अखंड उर्जेचा स्रोत आहात.तुम्ही आम्हाला विचारांचा उज्ज्वल वारसा दिला आणि त्यानुसार मार्गक्रमण करण्याचं बळ देखील… बाबा, तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा. तुम्हाला निरोगी असे दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा . pic.twitter.com/XY60FDeHwy— Supriya Sule (@supriya_sule) December 12, 2019
सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये लिहले की, ‘प्रिय बाबा, तुम्ही आमच्यासाठी अखंड उर्जेचा स्त्रोत आहात. तुम्ही आम्हाला विचारांचा उज्वल वारसा दिला आणि त्यानुसार मार्गक्रमण करण्याचे बळ दिले…. बाबा तुम्हाला वाढदिवसांच्या अगणित शुभेच्छा. तुम्हाला निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदीच्छा.’ शरद पवार सलग पन्नास वर्षे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात सक्रिय आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पवार हे प्रचाराचे केंद्रस्थान बनले होते. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापनेत शरद पवार यांनी किंगमेकर म्हणून भूमिका बजावली.
Visit : bahujannama.com