NCP Chief Sharad Pawar | खा. गिरीश बापटांनी दिला शरद पवारांना शब्द, म्हणाले – ‘मी आता बरा आहे, लवकरच परत येईन’
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार गिरीश बापट (BJP MP Girish Bapat) यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.. श्वसनाचा त्रास होत असल्याने गेल्या 20 ते 25 दिवसांपासून बापट यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी सोमवारी हॉस्पिटलमध्ये जाऊन बापट यांच्या प्रकृतीची विचारणा केली. त्यांनी बापट यांच्याशी संवाद देखील साधला. यावेळी गिरीश बापट यांनी मी आता बरा असून लवकरच परत येईल असे शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश बापट (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. मागील काही दिवसांपासून गिरीश बापट यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीमध्ये म्हणावी तशी सुधारणा होत नाही. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांना त्यांची चिंता वाटू लागली आहे. म्हणूनच शरद पवार यांनी सोमवारी रुग्णालयात जाऊन बापट यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारणा केली.
शरद पवार भेटण्यासाठी आले असता, तुम्ही जास्त बोलू नका, आराम करा, असा सल्ला त्यांनी दिला.
बापट यांना श्वसनाचा त्रास असल्या कारणाने, तुम्हाला जास्त बोलता येत नाही,
किती महिन्यापासून हा आजार सुरु आहे? अशी एकूण प्रकृती बाबत विचारणा शरद पवार यांनी केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शरद पवार यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गिरीश बापट म्हणाले,
मी गेल्या दोन महिन्यापूर्वी एका कार्यक्रमात गेलो होतो. तेव्हापासून मला आजार सुरु झाला.
मी बरा होईन, लवकरच कामाला लागेल. अशी चर्चा या दोन नेत्यांमध्ये झाली.
अशी माहिती शरद पवार यांच्यासोबत गेलेले प्रवीण गायकवाड यांनी दिली.
Web Title :- NCP Chief Sharad Pawar | ncp chief sharad pawar visits bjp mp girish bapat at dinanath mangeshkar hospital pune
हे देखील वाचा :
Pune Jain Community | झारखंड सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचा जैन समाजाकडून पुण्यात रॅली काढून निषेध
Tunisha Sharma Death | तुनिषाच्या आत्महत्येनंतर सहकलाकार शीझान खानने केला ‘हा’ मोठा खुलासा
Manushi Chhillar | ख्रिसमस स्पेशल लुकमध्ये मानुषी दिसतीय एकदम कडक; प्रेक्षक करत आहेत कौतुक
Comments are closed.