मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – उदयनराजे भोसले आपल्या खासदारकीचा राजीनामा देत नुकतेच भाजपमध्ये दाखल झाले आहेत. साताऱ्यात आता लोकसभेसाठी पोटनिवडणूक होणार असून या निवडणुकीत उदयनराजेंची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या हालाचली सुरु आहेत. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीतून 4 दिग्गजांची नावे चर्चेत आहेत.
उदयनराजेंविरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते शशिकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे. शशिकांत शिंदे यांचा आपल्या कोरेगाव मतदारसंघासह साताऱ्यातील इतर भागातही चांगला प्रभाव आहे. त्यामुळेच त्यांचं नाव आघाडीवर आहे अशी माहिती आहे. याशिवाय राष्ट्रवादीतून अविनाश मोहिते, नितीन लक्ष्मणराव पाटील, श्रीनिवास पाटील इत्यादी नावांचीही चर्चा आहे.
उदयनराजेंना पराभवाची भीती ?
खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आगामी विधासभेसोबतच साताऱ्याची पोटनिवडणूक घ्यावी. पोटनिवडणुकीत जर पराभव झाला तर राज्यसभेवर नियुक्ती करावी अशी अट भाजप प्रवेशावेळी उदयनराजेंनी ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता उदयनराजेंना पराभवाची भीती आहे का अशी चर्चा रंगताना दिसत आहेत.
उदयनराजेंचा त्यांचे चुलत बंधू शिवेंद्रराजे, रामराजे निंबाळकर आणि शशिकांत शिंदे यांच्याशी त्यांचा अनेकदा राजकीय संघर्ष झाला आहे. त्यामुळे उदयनराजेंसाठी आगामी पोटनिवडणूक सोपी असणार नाही हे मात्र नक्की. साताऱ्यातील राजकारण मोठं रंजक होणार आहे.
Visit : bahujannama.com