NCP Ajit Pawar On Congress Nana Patole | ‘…तर 16 आमदार निलंबित झाले असते’, अजित पवारांनी साधला नाना पटोलेंवर निशाणा (व्हिडिओ)

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – NCP Ajit Pawar On Congress Nana Patole | राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांच्यावर आरोप केला आहे. नाना पटोलेंनी त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांना न विचारता राजीनामा दिला. तसेच राजीनामा दिल्यावर माहिती देण्यात आली. पटोले यांनी राजीनामा दिला ही आमची चूक असल्याचं त्यांनी मान्य केलं. पटोलेंनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर 16 आमदार निलंबित (MLA Suspended) झाले असते, असेही अजित पवार म्हणाले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. (NCP Ajit Pawar On Congress Nana Patole)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दुर्दैवाने आमच्या सगळ्यांकडून…
प्रतोद नेमण्यापासून अनेक गोष्टींना सर्वोच्च न्यायालयाने चुकीचं म्हटलं आहे. मात्र पुढे काय झालं? एकतर आमचे त्यावेळचे विधानसभा अध्यक्ष (Assembly Speaker) नाना पटोले यांनी राजीनामा दिला. तो राजीनामा द्यायला नको होता. राजीनामा दिल्यानंतर लगेच पुन्हा विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊन तो विषय संपवायला पाहिजे होता. तेही दुर्दैवाने आमच्या सगळ्यांकडून झालं नाही. (NCP Ajit Pawar On Congress Nana Patole)
तर 16 आमदार तेव्हाच अपात्र झाले असते
मी यासाठी एकट्याला दोषी धरत नाही. आमच्या महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) तो विषय तातडीने धसास लागला असता तर तिथं विधानसभा अध्यक्ष बसले असते आणि त्यांच्या अधिपत्याखाली या सर्व गोष्टी झाल्या असत्या. मोठा काळ विधानसभेचे उपाध्यक्ष काम पाहत होते. अध्यक्षांची जागा रिक्त झाली होती. या घटना घडल्यानंतर शिंदे-फडणवीस यांनी पहिल्यांदा बहुमताच्या जोरावर ती जागा भरली. जर त्या ठिकाणी मविआचे नेते असते तर त्यांनी 16 आमदारांना तेव्हाच अपात्र ठरवलं असतं, असंही अजित पवार म्हणाले.
राजीनामा देतील असं स्वप्न पाहू नये
विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नैतिकता पाळून राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, नैतिकतेवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राजीनामा देतील असं स्वप्न पाहू नये, अशी टीका त्यांनी केली. अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची उंची आताचे भाजपचे (BJP) नेते गाठू शकत नाहीत. नैतिकतेच्या आधारे राजीनामा देण्याचा विचार ते स्वप्नातही करु शकत नाहीत. राजीनाम्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की जे मला त्यावेळेस योग्य वाटलं ते केलं. असा प्रसंग कोणावरही येऊ नये, आला तर आताच्या अनुभवावरुन निर्णय घ्यावा, असा सल्ला अजित पवार यांनी दिला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पक्षांतर बंदी कायद्यात कितपत अर्थ उरेल
अजित पवार न्यायालयाच्या निकालावर म्हणाले, मी दोन दिवसांपूर्वी लातूरमध्ये सांगितले होते की हा
निकाल विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला जाईल. मात्र, या निकालाचे दूरगामी परिणाम होतील.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पक्षांतर बंदी कायद्यात कितपत अर्थ उरेल किंवा राहिल की नाही याची
भीती वाटते, राज्या अशा घटना घडल्या की राजकीय स्थिरतेवर परिणाम होतो. लोकांच्या जनमताचा अपमान होतो.
Web Title :- NCP Ajit Pawar On Congress Nana Patole | NCP leader ajit pawar serious allegations on nana patole after supreme court judgement on maharashtra political crisis
हे देखील वाचा :
Comments are closed.