नवी दिल्ली : नॅशनल केमिकल लॅबोरॅटरीमध्ये टेक्निकल ऑफिसर, सीनियर टेक्निकल ऑफिसर, फायर सेफ्टी ऑफिसर तसेच इतर अनेक पदांवर योग्य उमेदवारांच्या भरतीसाठी योग्य उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. 10वी पास ते ग्रॅज्युएटपर्यंतच्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. एकुण 45 रिक्त पदांवर भरती होईल. ज्यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षा पास व्हावे लागेल. मात्र, सीनियर पदांवर भरती थेट इंटरव्ह्यूच्या माध्यमातून केली जाईल. अर्ज आणि निवडीशी संबंधीत सर्व माहितीसह ऑफिशियल नोटिफिकेशन ncl-india.org वर जारी केले आहे. उमेदवारांनी माहिती नोटिफिकेशनमध्ये चेक केल्यानंतर ऑनलाइन अर्ज करावा.
NCL Recruitment 2020 : जारी पदांची माहिती
टेक्नीशियन 20
टेक्नीशियन असिस्टंट 10
टेक्निकल ऑफिसर 12
सीनियर टेक्निकल ऑफिसर 02
सीनियर तंत्रज्ञान अधिकारी (फायर सेफ्टी ऑफिसर) 01
एकुण 45
पात्रता
ऑफिसर पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवार संबंधित ट्रेडमध्ये B.E./B.Tech ची डिग्री तथा निर्धारित अनुभव आवश्यक आहे. तर टेक्नीशियन पदांवर सायन्स स्ट्रीममधून 10वी पास उमेदवार अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा
अर्जासाठी कमाल वयोमर्यादा सुद्धा पदांनुसार वेगवेगळी ठरवण्यात आली आहे. उमेवाराने अधिक माहितीसाठी अधिकृत नोटिफिकेशन चेक करावे, जे डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा.
अर्ज शुल्क
UR/ EWS /OBC कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100/- रुपये आहे. तर अन्य राखीव वर्गासाठी अर्ज निशुल्क आहे.
महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया 2 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे तथा ऑनलाइन माध्यमातून अधिकृत वेबसाइटवर अप्लाय करण्याची शेवटची तारीख 2 डिसेंबर आहे. उमेदवारांनी आपले भरलेल्या फॉर्मची हार्ड कॉपी 31 डिसेंबरपर्यंत या पत्त्यावर जमा करावी लागेल.
फॉर्म पाठवण्याचा पत्ता :
प्रशासकीय अधिकारी
सीएसआयआर – राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा
डॉ. होमी भाभा मार्ग, पुणे – 411008 (महाराष्ट्र)