पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Nawab Malik |राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) मागील दोन महिन्यापासून चर्चेत आहेत. समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि नवाब मलिक यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा चांगलाच सामना रंगला आहे. आता नवाब मलिक (Nawab Malik) यांनी राज्य सरकारच्या (Maharashtra Government) दोन वर्षांच्या कार्यकाळाचं कौतुक केलं आहे. तसेच कोविड (covid-19) काळात राज्य सरकारने चांगलं काम केलं असून सरकारच्या हलगर्जीपणामुळे (duenegligence) एकही मृत्यू झाला नसल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. ते पुण्यात (Pune) पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुणे येथील पत्रकार परिषद पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://t.co/7sJcd9Vbim
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 30, 2021
नवाब मलिक पुढे म्हणाले, शासनाने डेडिकेटेड कोविड सेंटर (Dedicated Covid Center) उभे केले होते. त्याठिकाणी रुग्णांना चांगल्या सुविधा दिल्या, तिथे रुग्णांना बेड मिळाले. सरकारी रुग्णालयात एकही बेड नव्हता, म्हणून रुग्ण दगावले नाहीत. सरकारी रुग्णालयातही बेड आणि ऑक्सिजनची पूर्तता होत होती. केवळ, रुग्णांच्या नातेवाईकांच्या सिलेक्टीव्ह मागणीच्या ठिकाणीच या अडचणी जाणवल्या आहेत. म्हणजे, एखाद्याला रुबी रुग्णालयातच (Ruby Hospital) उपचार हवे होते, पण तेथे ते मिळाले नाहीत, असे सांगत मलिक (Nawab Malik) यांनी कोविड काळात राज्य सरकारने चांगले काम केल्याचं प्रमाणपत्रच दिलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू नाही
कोविड काळात सरकारच्या हलगर्जीपणामुळे किंवा ऑक्सिजन (Oxygen) अभावी एकही मृत्यू झाला नाही. नाशिक, पालघर यांठिकाणी काही दुर्घटना घडल्या, त्या दुर्घटनेत रुग्णांचा जीव गेला. या दुर्घटनेतून रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचे मलिक यांनी सांगितले. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी परमबीर सिंह (Parambir Singh), सचिन वाझे (Sachin Vaze), भाजपचं राजकारण यासह अनेक मुद्यांवर भाष्य केलं.
Web Title :- Nawab Malik | there are no deaths state due government negligence covid 19 claims ncp leader and minister nawab malik.
Rekha Jare Murder Case | रेखा जरे हत्याकांडाला वर्ष झाले तरी न्यायालयात सुनावणी नाही