मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Nawab Malik-Kirit Somaiya | राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि भाजप (BJP) यांच्यात अनेक कारणावरुन शीतयुद्ध पाहायला मिळते. नुकतंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या खळबळजनक वक्तव्यामुळे राज्यात वादंग निर्माण झाला आहे. दरम्यान, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी वादग्रस्त विधान केल्याचं समोर आलं आहे. मलिक यांनी भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर वादग्रस्त भाषेत विधान केलं आहे. (Nawab Malik-Kirit Somaiya)
नांदेड येथे बोलताना नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले, “चित्रपट जशी चालवण्यासाठी आयटम गर्लची गरज लागते. मला वाटतं राजकीय क्षेत्रामध्ये किरीट सोमय्या भाजपाच्या आयटम गर्ल सारखे राजकारण करत आहेत. बातमी कशी होईल त्यासाठी आयटर्म गर्लचा कार्यक्रम सुरु आहे,” असं ते म्हणाले. (Nawab Malik-Kirit Somaiya)
काय म्हणाले होते किरीट सोमय्या?
‘नवाब मलिक यांना मला काहीतरी बक्षीस (गिफ्ट) द्यायचं आहे. त्यांनी गेल्या महिन्यात असं काही सांगितलं की बीड जिल्ह्यात देवस्थानाची जमीन कुणाला तरी दिली गेली याची चौकशी करणार आहोत. खरं म्हणजे देवस्थानाची जमीन धनंजय मुंडे यांनी खाल्ली. पण आता रायगडमधील कर्जत येथे देवस्थानच्या जमिनीचे सातबारा माझ्या हातात आले आहेत. आज मी जाऊन ते कन्फर्म करणार आहे. तसेच या देवस्थानची जमीन या व्यक्तीवर कशी गेली याची चौकशी झाली पाहिजे,’ असे किरीट सोमय्या यांनी म्हटलं होतं.
Web Title :- Nawab Malik-Kirit Somaiya | kirit somaiya bjp items girl controversial statement of nawab malik
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Maharashtra Weather | महाराष्ट्रात किमान तापमान 6 अंशांनी खाली, ‘या’ जिल्ह्यात सर्वात कमी तापमान
SBI ची बेस्ट योजना ! घरबसल्या महिन्याला कमवू शकता 60 हजार रुपये; जाणून घ्या
Pune Crime | धक्कादायक ! पत्नीसह सासू, मेहुण्यांनी केली बेदम मारहाण, निवृत्त सैनिकाचा मृत्यू