नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काम्या कार्तिकेयन या १२ वर्षाच्या विद्यार्थिनीने आशियाबाहेरील सर्वोच्च शिखर माउंट एकांकगुआ जिंकला आहे. माउंट एकांकागुआ दक्षिण अमेरिका अर्जेंटिनामधील अँडिस पर्वत मधील सर्वोच्च शिखर आहे. काम्या कार्तिकेयन ही मुंबईतील नेव्ही चिल्ड्रन स्कूलमध्ये सातवीची विद्यार्थिनी आहे. माउंट एकांकगुआची उंची ६९६९ मीटर आहे, ते आशियाबाहेरील सर्वोच्च शिखर आहे. कार्तिकेयने १ फेब्रुवारी रोजी डोंगराच्या शिखरावर तिरंगा फडकविला.
नौदल अधिकाऱ्यांनी सांगितले की, काम्याने दीर्घकालीन शारीरिक, मानसिक आणि साहसी खेळांमध्ये नियमित सहभाग घेतल्याने तिला कठीण परिस्थितीत चढाई पूर्ण करण्यास मदत झाली. काम्या यांचे वडील एस. कार्तिकेयन भारतीय नौदलात कमांडर आहेत, तिची आई व्यवसायाने शिक्षिका आहे. लहानपणापासूनच कम्यामध्ये पर्वतारोहणांची आवड निर्माण झाली.
यापूर्वीही काम्या अनेक उंच पर्वतांवर चढली आहे. यापूर्वी, २४ ऑगस्ट २०१९ रोजी, तिने ६२६० मीटर उंच मेंटलक कांगडी २ देखील कठीण परिस्थितीत सर केली. काम्याने वयाच्या अवघ्या तीन वर्षांपासून पर्वतारोहण सुरू केले. त्यानंतर ती लोणावळ्यात बेसिक ट्रेकवर गेली. वयाच्या ९ व्या वर्षी, काम्याने तिच्या पालकांसह उत्तराखंडमध्ये अनेक उच्च-उंचीचे ट्रेक केले. वयाच्या दहाव्या वर्षी कम्या नेपाळमध्ये ५३४६ मीटर उंचीवर एव्हरेस्ट बेस कॅम्पमध्ये पोहचली. काम्या माउंट स्टोक कांगडी येथे पोहोचणारी सर्वात कमी वयाची पर्वतारोहण देखील ठरली आहे.