मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मागील वर्षी हवामानात बरेच बदल झाले असून यावर्षीची मुंबईकरांची सुरुवात थंडीने झाल्यामुळे मुंबईकर चांगलेच आनंदी आहेत. पण आता मात्र येणाऱ्या आठवड्यात विदर्भात थंडी सरून काही भागात विजेच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेकडून दर्शवण्यात येत आहे. त्यामुळे राज्याच्या महत्वपूर्ण जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
उत्तर भारतात बर्फवृष्टी आणि पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले असून आता मध्य भारतातील हवामान अजून खराब होण्याची शक्यता आहे. तर पुढील २४ ते ४८ तासात अनेक शहरात वादळी वारे आणि पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान अंदाज दर्शवत आहे.
महाराष्ट्राच्या हवामानात मोठे बदल होताना पाहायला मिळणार असून विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यात काही भागात पुढील २४ तासांत हलक्या सरी आणि गडगडाटीसह पाऊस पडेल. तर राज्यातील नागपूर, नाशिक, गडचिरोली, यवतमाळ, बीड आणि नांदेड या भागांना पावसाचा फटका बसणार असून उ. महाराष्ट्रात येत्या २४ तासात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच बहुतांश भागात आकाश ढगाळ असेल तर मुंबईत अंशत: वातावरण राहील.
अगले एक सप्ताह, नांदेड़, अकोला, चंद्रपुर, परभणी जैसे शहरों समेत सम्पूर्ण विदर्भ क्षेत्र में बारिश जारी रहने का अनुमान है। वहीं, महाराष्ट्र के बाकी हिस्सों में मौसम शुष्क बना रहेगा।#Maharashtra https://t.co/cyxJ6fDv67
— SkymetWeather (@SkymetWeather) February 2, 2020
मध्य प्रदेश आणि छत्तीसगदमध्ये येणाऱ्या ४८ तासात हवामान अजून खराब होईल अशी शक्यता असून हवामानाच्या मॉडेलनुसार या राज्यांच्या पूर्वेकडील आणि मध्य भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या २४ तासात आंध्र प्रदेश, विदर्भ, तेलंगणा, केरळ, अरुणाचल प्रदेश आणि आसाममधील काही ठिकाणी वादळी पावसासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जम्मू – काश्मीर आणि हिमाचल प्रदेश येथे ३ फेब्रुवारीला काही ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता असून दक्षिण ओडिशा, द.छत्तीसगड, विदर्भ आणि पूर्व मध्य प्रदेशामधील काही भाग ढगाळ वातावरण राहील. तसेच हलका पाऊसही पडेल. पुढील 24 तासांमध्ये, पश्चिम अस्थिरतेच्या परिणामासह दिवसा आणि रात्रीचे तपमान नोंदवले जाईल, ज्यामुळे दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशात थंडीपासून आराम मिळण्याची शक्यता आहे.