अहमदाबाद : वृत्तसंस्था – देशात स्वयंघोषित गोरक्षकांकडून होणारे हल्ले सुरु असतानाच गोरक्षकांकडून लोको पायलटला अनेकदा मारहाण करण्याचा प्रकार समोर आलाय, ट्रेन वेगात असताना अचानक समोर आलेल्या गायीचा मृत्यू झाल्यानं कथित गोरक्षकानं लोको पायलटला अनेकदा मारहाण केली. पाटणमधील सिधपूर जंक्शनजवळ हा प्रकार घडला.
लोको पायलट ग्वालियार-अहमदाबाद सुपरफास्टवर सेवा बजावत होते. त्यावेळी सिधपूर जंक्शनजवळ एक गाय अचानक रुळांवर आली. यावेळी स्टेशन मास्तरांनी लाल निशाण फडकावलं. मात्र झाला यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि गाय रेल्वेखाली आली. यानंतर झाला यांनी गायीचं मृत शरीर उचलण्यासाठी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी स्वत:ला गोरक्षक म्हणवणाऱ्या बिपीनसिंह राजपूत नावाच्या २८ वर्षीय प्रवाशानं शिवीगाळ करत राजपूत यांनी लोको पायलट यांच्यावर हल्ला केल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं आहे.
दरम्यान, घटनास्थळी १५० गोरक्षकांचा जमाव आला आणि त्यांनी ‘झाला’ यांना धमकावण्यास सुरुवात केली. यानंतर थोड्या वेळानं ट्रेन सुरू झाली आणि राजपूत यांनी दोनवेळा झाला यांच्यावर हल्ला केला. पोलिसांची मदत घेण्यासाठी ‘झाला’ मेहसाणात उतरले. त्यावेळी राजपूत यांनी पुन्हा त्यांच्यावर हल्ला केला. सध्या पोलिसांनी गोरक्षक बिपीनसिंह राजपूतला ताब्यात घेतल आहे.