बहुजननामा ऑनलाइन टीम – आज घडलेल्या एन्काऊंटरसंदर्भातील वृत्त सकाळपासूनच माध्यमातून प्रसारित होत होते. त्यानंतर सगळ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. काहींच्या उलट-सुलट प्रतिक्रियेनंतर या प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली आहे. त्याचबरोबर विशेष पथकाला घटनास्थळी पाहणी करुन चौकशी अहवाल लवकर सादर करण्याचे आदेश देखील दिले आहे. या प्रकरणाबाबत तपास विभागाच्या पोलीस उपमहासंचालकांच्या नेतृत्वाखाली आयोगाने एक पथक तयार केले आहे. या पथकाला एन्काऊंटर झालेल्या घटनास्थळाला भेट देऊन या घटनेतील तथ्य तपासण्याचे आदेश दिले आहेत.
NHRC has asked its DG (Investigation) to immediately send a team for a fact finding on the spot investigation into the matter. The team of the Investigation Division of the Commission headed by an SSP, is expected to leave immediately and submit their report, at the earliest. https://t.co/s23llzMOE1
— ANI (@ANI) December 6, 2019
पहिले फक्त माध्यमातून या एन्काऊंटरबद्दल बातम्या प्रसारित होत होत्या. त्यानंतर घटनेच्या सुमारे १० तासांनंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हैदराबाद पोलिसांनी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन संपुर्ण घटनेची माहिती दिली. पोलिसांच्या भुमिका स्पष्ट होत नसल्याने तत्पूर्वी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची गंभीर दखल घेत संदर्भात सुओमोटो याचिका दाखल करुन घेतली. त्याचबरोबर तातडीने घटनास्थळी जाऊन चौकशीचे आदेशही दिले.
आरोपींनी पोलिसांवर हल्ला करत बंदूक हिसकावून घेतली आणि गोळीबार करण्यास सुरुवात केल्याने स्वसंरक्षणासाठी गोळीबार करत त्यांना ठार करण्यात आल्याची माहिती सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही.सी सज्जनार यांनी पत्रकार परिषदेत दिली. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच आरोपींचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
Visit : bahujannama.com