नवी दिल्ली: वृत्तसंस्था – देशभरात सध्या FASTag सुविधा सुरु जझालेली आहे. लोकांना याचा फायदा देखील मिळत आहे. पुढील लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे फास्टॅग बॅलन्स संपताच ते रिचार्ज होणे गरजेचे आहे. यासाठी FASTag मध्ये किती बॅलेन्स शिल्लक आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनीने (आयएचएमसीएल) यासाठी मिस कॉस सुविधा सुरू केली आहे. तीच कंपनी FASTag बॅलन्स (प्रीपेड) चा हिशोब ठेवते. कंपनीने जारी केलेल्या +91-8884333331 या क्रमांकावर आपल्या नोंदणीकृत मोबाइलवरून मिस कॉल देऊन ग्राहकांना FASTag बॅलन्स किती आहे याची माहिती मिळू शकते.
काय आहे ही सुविधा ?
* आयएचएमसीएलकडून प्राप्त माहितीनुसार ही सुविधा 24X7 उपलब्ध आहे.
* खास गोष्ट अशी आहे की यासाठी इंटरनेटची आवश्यकता नाही.
* मोबाईल नंबरवर एकापेक्षा जास्त वाहनांची नोंद असल्यास सर्व गाड्यांचे फास्टॅग बॅलेन्स ची माहिती मिळवता येऊ शकते.
* ज्या वाहनाचे फास्टॅग बॅलेन्स शिल्लक कमी आहे त्या वाहनसाठी स्वतंत्र एसएमएस पाठविला जाईल.
* याची नोंद घ्यावी की ही सुविधा केवळ NHAI फास्टॅग वापरकर्त्यांसाठी आहे.
* म्हणजेच आपले FASTag खाते NHAIच्या प्रीपेड वॉलेटशी जोडलेले असेल तरच बॅलेन्सची माहिती मिळेल. इतर बँकांशी कनेक्ट असेल तर नाही.
NHAI चे My FASTag App
NHAI ने My FASTag App सुरु केले आहे. आतापर्यंत २.५ लाख लोकांनी या अँप वर रजिस्ट्रेशन केले आहे. NHAI FASTag ला कोणत्याही सेविंग बँक खात्याशी लिंक केले जाऊ शकते. हे एक प्रीपेड अकाउंट असेल ज्यात FASTag ची रक्कम कट होते. एकूण 13 बँका आहेत, ज्यांच्याशी NHAIने करार केला आहे.