नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ईपीएफओ खातेधारकांसाठी आणि नोकरदारांसाठी ही कामाची बातमी आहे. ईपीएफओ (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था) ने लाखो खातेधारकांसाठी नवी सुविधा सुरू केली आहे. ईपीएफओच्या पोर्टलवर date of exit चे नवे फीचर समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे आता खातेधारक आणि कर्मचारी आपली नोकरी बदलल्यानंतर याची माहिती पोर्टलवर अपडेट करू शकतील. आतापर्यंत खातेधारकांकडे हा अधिकार नव्हता. अशात नोकरी सोडणे किंवा नोकरी सोडण्याच्या शेवटचा दिवस नोंदविण्यासाठी आपल्या पूर्वीच्या कंपनीवर अवलंबून रहावे लागत होते. कारण ईपीएफच्या सब्स्क्रायबर्सकडे ऑनलाइन सुविधा नव्हती. परंतु, आता खातेधारक आपली नोकरी सोडल्याची तारीख स्वत: अपडेट करू शकणार आहे. ईपीएफओने ट्विट करत या नवीन निर्णयाची माहिती दिली आहे.
EPFO portal वर Date Of Exit ला कसे अपडेट कराल, जाणून घ्या
1) EPFO portal वर तुमच्या UAN (Universal Account Number) चा पासवर्ड टाकून लॉन इन करा
2) यानंतर Manage सेक्शनमध्ये जा. येथे Mark Exit वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला ड्रॉपडाउन मेन्यू select employment मध्ये PF खाते नंबर निवडण्याचे ऑपशन मिळेल.
3) येथे नोकरी सोडल्याची तारीख आणि कारणाचा उल्लेख करा. यानंतर Request OTP ऑपशन वर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या आधारवरून लिंक मोबाइल नंबरवर एक OTP येईल. यानंतर चेकबॉक्सला सिलेक्ट करा आणि यानंतरUpdate वर क्लिक करा आणि नंतर OK वर क्लिक करा.
4) यानंतर तुम्हा मेसेज प्राप्त होईल, तुमचे date of exit सफलतापूर्वक अपडेट झाले आहे. एकदा हे झाल्यावर तुम्ही View आणि Service History वर जाऊन पाहू शकता. येथे तुम्हाला डेट ऑफ जॉयनिंगपासून एग्झिटपर्यंतची माहिती EPF आणि EPS कडून दाखवली जाईल.
हे लक्षात ठेवा
तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की, तुम्ही तुमची डेट ऑफ एग्झिट कंपनी सोडण्यापूर्वी दोन महिने अगोदर मार्क करू शकत नाही. मागील वेळी अनेक EPF खातेधारकांनी ही तक्रार केली की त्यांच्या मागील कंपन्यांनी त्यांना EPFO वर डेट ऑफ एग्झिट घोषित करण्यासाठी सहकार्य केले नाही.
यासाठी हे महत्वाचे आहे
नोकरी सोडण्याची तारीख नोंदवणे खुप गरजेचे आहे. भविष्यात होणारी सेटलमेंट आणि क्लेमवर या गोष्टीचा खुप परिणाम होतो. नोकरी बदलल्यानंतर जर तुमची डेट ऑफ एग्झिट योग्य पद्धतीने नोंद झाली नाही तर नोकरीच्या रिकॉर्डला कायम मानले जात नाही. यामुळे तुम्हाला तुमच्या पैशांवर टॅक्स भरण्यास सांगितले जाते.
Visit : bahujannama.com