नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसची नवीन प्रकरणे वाढत १४७ वर पोहोचली आहे. तर या व्हायरसच्या संक्रमणामुळे देशात तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. वैद्यकीय समुदाय वाढत्या संक्रमणावर ठेवून आहे. ते यावर अभ्यास करत आहेत, जेणेकरून व्हायरसपासून बचाव करण्यासाठी पूर्ण तयारी केली जाईल. चीनच्या वुहानमध्ये व्हायरसचे पहिले प्रकरण समोर आल्यानंतर तीन महिन्यात जगभरात यामुळे ७,५०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तब्बल १६० पेक्षा जास्त देशात कोरोना व्हायरस पसरला असून लाखो लोकं याने संक्रमित झाले आहेत.
पुरुषांना या व्हायरसपासून जास्त धोका
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था दिल्लीचे निदेशक रणदीप गुलेरिया यांनी एका वृत्तसंस्थेसह बोलताना सांगितले की, वैद्यकीय समुदायाने अजूनपर्यंत ज्या आकड्यांचा अभ्यास केला आहे, त्यात हे दिसले आहे कि पुरुषांना महिलांपेक्षा संक्रमणाचा धोका जास्त आहे. ते पुढे म्हणाले की, हा व्हायरस आपल्या पाळीव प्राण्यांपासून होत नाही. सोबतच तुमच्यापासून पाळीव प्राण्यांना होणार पण नाही. हे माणसांना संक्रमित करते. सध्यातरी या व्हायरससोबत लढण्याची क्षमता माणसात जास्त दिसून येत आहे.
महिलांच्या तुलनेत जास्त पुरुष संक्रमित
गुलेरिया म्हणाले की, महिलांच्या तुलनेत हा व्हायरस पुरुषांना जास्त झाला आहे, हे मनोरंजक आहे. सोबतच वुहानमध्ये एका अभ्यासाने हेही समजले आहे कि ‘ए’ रक्तगट असणाऱ्या लोकांना व्हायरस जास्त प्रभाव करतो. एम्स प्रमुखांनी म्हटले की, अजूनही याचे कारण समजलेले नाही. मला नाही माहित कि काय ही महिलांची इम्युनिटी आहे, जी पुरुषांच्या तुलनेत चांगली आहे. ते म्हणाले की, चीनकडून जे आकडे आले त्यावरून समजते कि महिलांच्या तुलनेत जास्तकरून पुरुषांना गंभीर आहे. त्यांनी चेतावणी दिली की, या प्रकारच्या तथ्यांबाबत निश्चित होणे आत्ता घाई होईल, कारण आरोग्य समुदाय अजूनही प्रासंगिक डेटा एकत्र करण्याच्या प्रक्रियेत आहे.
हर्ड इम्युनिटी थेअरी
ब्रिटनने या रोगाविरुद्ध लढण्यासाठी समाविष्ट केलेल्या ‘हर्ड इम्युनिटी थेअरी’ विषयी बोलताना गुलेरिया म्हणाले की, काही देश जरी ‘हर्ड इम्युनिटी’ सिद्धांत स्वीकारत असले तरी त्याचे परिणाम अत्यंत कठोर असू शकतात. हर्ड इम्युनिटीचा अर्थ असा की, ६० टक्के लोकसंख्या जे निरोगी आहेत, देश त्यांना संसर्ग घेण्यास आणि त्यांच्या स्वतःच्या प्रतिकारशक्तीवर मात करण्याची परवानगी देतो.